चरणजीत सिंग चन्नी होणार पंजाबचे नवे मुख्यमंत्री

चरणजीत सिंग चन्नी होणार पंजाबचे नवे मुख्यमंत्री

पंजाबमधील राजकीय पेचावर अखेर तोडगा निघालेला दिसत आहे. काँग्रेस पक्षाचे चरणजीत सिंग चन्नी यांची पंजाबचे नवे मुख्यमंत्री म्हणून निवड करण्यात आली आहे. पंजाबचे ते पहिले दलित मुख्यमंत्री असणार आहेत.

पंजाबचे माजी मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी शनिवार, १८ सप्टेंबर रोजी तडकाफडकी आपला राजीनामा राज्यपालांकडे सुपूर्त केल्यानंतर पंजाबमध्ये राजकीय पेचप्रसंगाला सुरुवात झाली. पंजाबचा नवा मुख्यमंत्री कोण होणार याबाबत बरेच चर्चा होताना दिसत होती. तर या सगळ्यात काँग्रेस पक्षातील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला आहे.

रविवार 19 सप्टेंबर रोजी सकाळपासूनच पंजाबचा मुख्यमंत्री पदासाठी निरनिराळी नावे समोर येताना दिसली. पण अखेर त्यातून चरणजीत सिंग चन्नी यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे. पंजाबमधील या आधीच्या अकाली दल भाजपच्या आघाडी सरकारच्या काळात चन्नी हे विधानसभेचे विरोधी पक्षनेते म्हणून काम करत होते. तर चमकौर विधानसभा मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून येणारे चन्नी हे अमरिंदर सरकारमध्येही मंत्री राहिले आहेत.

हे ही वाचा:

उल्हासनगर कायदा-सुव्यवस्थेच्या नावाने उल्हास…घडली आणखी एक घटना!

ठाकरे सरकारची तंतरली! किरीट सोमैय्यांना कोल्हापुरात प्रवेशबंदी

धक्कादायक! वापरलेले तेल पुन्हा विकले जात आहे रस्त्यावरील खाद्यपदार्थ बनविण्यासाठी

पंजाबमध्ये ‘पंजा’चा गोंधळ सुरूच! सुखजिंदर रंधावांचे नाव मुख्यमंत्री पदासाठी चर्चेत

चन्नींच्या निवडीवरून होणार वाद?
कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी आधीच काँग्रेस पक्षाला इशारा दिला होता की त्यांच्याच गटातील कोणाला तरी मुख्यमंत्री केले जावे. अन्यथा विधिमंडळात बहुमत सिद्ध करावे. पण चन्नी हे अमरिंदर सिंग यांचे विरोधक म्हणून प्रसिद्ध आहेत. त्यामुळे पंजाबचे राजकारण अजून चिघळणार का? हे बघणे महत्वाचे ठरणार आहे.

Exit mobile version