पंजाबमध्ये काँग्रेसने कॅप्टन अमरिंदर सिंग यांना मुख्यमंत्रिपदावरून हटवल्यानंतरही सत्तासंघर्ष सुरूच आहे. पुढील वर्षी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस आपला पक्ष आणि सरकार स्थिर करण्याचा प्रयत्न करत असताना, नवज्योतसिंग सिद्धूच्या व्हायरल व्हिडिओने स्वतःच्याच मुख्यमंत्र्यांवर टीका केली आहे. चरणजित सिंग चन्नी पंजाबमध्ये २०२२ विधानसभा निवडणुकीत काँग्रेससाठी मार्ग खडतर करतील.
It’s really Shameful act when @sherryontopp was abusing to Hon’ble CM Pb. @CHARANJITCHANNI .
I can’t understand that So called @INCIndia’s highest command @RahulGandhi @priyankagandhi & @harishrawatcmuk still sleeping or helping @narendramodi to make India #CongressMukat pic.twitter.com/LbnjLxqbHT— Varinder S Brar (@VBrarINC) October 7, 2021
हा व्हिडिओ पंजाबच्या झिरकपूरचा आहे, जिथून सिद्धूने उत्तर प्रदेशातील लखीमपूर खिरीच्या दिशेने मोर्चा सुरू केला. व्हिडिओमध्ये सिद्धू मुख्यमंत्री चरणजीत सिंह चन्नी यांची वाट पाहताना दिसले यावेळी त्यांचे निकटवर्तीय आणि कॅबिनेट मंत्री परगट सिंह आणि पंजाब काँग्रेसचे कार्याध्यक्ष सुखविंदर सिंग डॅनी. सिद्धू नाराज होते. कारण त्यांना निषेध मोर्चा सुरू करण्यापूर्वी सीएम चन्नी यांची वाट पाहावी लागली. सिद्धू असे म्हणताना पाहायला मिळाले की, ते बराच वेळ चन्नीची वाट पाहत तात्कळत होते.
व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये, परगट सिंह सिद्धूला सांगून शांत करण्याचा प्रयत्न करताना दिसले की चन्नी दोन मिनिटात त्यांच्यासोबत मोर्चात सामील होऊ शकतात. यानंतर, सिद्धूचे लक्ष वेधण्यासाठी, डॅनी त्यांना सांगताना दिसतात की, मोर्चा यशस्वी होईल.
हे ही वाचा:
आरे वसाहतीत आता बिबट्यांपायी दुचाकीवरून फिरणेही मुश्कील
नवाब मलिकविरोधात १०० कोटींचा दावा करणार मोहित कंबोज
आशिष मिश्रा एसआयटीसमोर; आता वास्तव येईल समोर
संजय राऊत…काश्मीरात भाजपाने हे केले!
यावर सिद्धूने उत्तर दिले, “आता यश कोठे आहे? चन्नी २०२२ मध्ये काँग्रेसला बुडवतील.” २०२२ मध्ये ते (चन्नी) काँग्रेसला बुडवतील, असे सिद्धू यांनी मुख्यमंत्री चन्नी यांच्यासाठी अपशब्द वापरताना सांगितले. कॅप्टन अमरिंदर सिंग यांच्यानंतर हटवून चन्नी यांनाही आता पदावरून दूर करण्याचा आणि पंजाबचे मुख्यमंत्री होण्याचा सिद्धू यांचा डाव असल्याचे या व्हिडिओने स्पष्ट केले.