पंजाबचे मुख्यमंत्री चन्नी यांच्यावर महिला आयएएस अधिकाऱ्याने काय केला होता आरोप?

पंजाबचे मुख्यमंत्री चन्नी यांच्यावर महिला आयएएस अधिकाऱ्याने काय केला होता आरोप?

अमरिंदर सिंग यांच्या राजीनाम्यानंतर पंजाबचे मुख्यमंत्री म्हणून चरणजीत सिंग चन्नी यांचे नाव निश्चित झाले असले तरी त्यांचा पूर्वेतिहास मात्र वादग्रस्त आहे.

पंजाबच्या मंत्रिमंडळात तंत्रशिक्षण खात्याचे मंत्री राहिलेले चन्नी यांच्याविरोधात एका महिला आयएएस अधिकाऱ्याला अश्लील मेसेज पाठविल्याचा आरोप झाल्याचे प्रकरण समोर येते. त्याच आयएएस अधिकाऱ्याने प्रशासनातील अधिकाऱ्यांना ही बाब निदर्शनास आणली होती. त्यानंतर तत्कालिन मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांच्याकडे हे प्रकरण गेले.

तेव्हा अमरिंदर यांनी हे प्रकरण गंभीर असून त्याची दखल घेतली जाईल, असे म्हटले होते. परदेश दौऱ्यावर असताना अमरिंदर यांच्या कानावर ही गोष्ट घालण्यात आली होती. तेव्हा अमरिंदर म्हणाले होते की, माझ्या ही बाब लक्षात आणून दिली आहे आणि मी संबंधित मंत्र्यांना त्या महिला अधिकाऱ्याची माफी मागण्यास सांगितले आहे.

त्यावेळी शिरोमणी अकाली दल आणि आम आदमी पार्टी यांनी या संबंधित मंत्र्याचे नाव उघड करण्याची मागणी केली होती. तेव्हा चन्नी हे चमकौर साहीब येथील मतदारसंघातील आमदार होते. त्याचवेळी मी टू चळवळीत ज्यांचे नाव अडकले त्या एमजे अकबर यांच्या राजीनाम्याची मागणी करणाऱ्या काँग्रेसने चन्नी यांच्याबाबत मात्र जाणीवपूर्वक गप्प राहणे पसंत केले होते.

हे ही वाचा:

जॅवलिन एक प्रेमकथा…नीरज चोप्राच्या जाहिरातीचा धमाका

चरणजीत सिंग चन्नी होणार पंजाबचे नवे मुख्यमंत्री

किरीट सोमैय्या कोल्हापूरमध्ये दाखल होणार?

रॉयटर्स म्हणाले, पंतप्रधानांनी वाढदिवशी अमूल्य भेट देशाला दिली!

आता काँग्रेस महिलांच्या सन्मानाच्या गोष्टी करत असताना महिलेबाबत आक्षेपार्ह वर्तनाचा आरोप असलेल्या चन्नी यांना मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी सोपविल्यामुळे काँग्रेसच्या महिलाविषयक धोरणाबद्दल शंका घेतली जाऊ लागली आहे.

Exit mobile version