अमरिंदर-शहा भेटीनंतर चन्नी-मोदी भेट

अमरिंदर-शहा भेटीनंतर चन्नी-मोदी भेट

पंजाबचे मुख्यमंत्री चरणजित सिंह चन्नी यांनी आज (शुक्रवारी) ७ लोक कल्याण मार्ग या पंतप्रधान निवासस्थानावर पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतली. काँग्रेस पक्ष पंजाबच्या परिस्थितीत व्यस्त असताना ही भेट झाल्यामुळे राजकीय विश्लेषकांच्या भुवया उंचावल्या आहेत. ही सौजन्य भेट असल्याचे सांगतले जात आहे. अहवालात म्हटले आहे की चन्नी १ ऑक्टोबरपासून पंजाबमधील तांदूळ खरेदी स्थगित करण्याबाबत केंद्र सरकारने काढलेले पत्र मागे घेण्याची विनंती करतील. केंद्राने गुरुवारी पंजाब आणि हरियाणामध्ये खरीप धान्य खरेदी ११ ऑक्टोबरपर्यंत स्थगित केली आहे. नुकत्याच झालेल्या मुसळधार पावसामुळे पीक उगवण्यास विलंब होत आहे.

पंजाबच्या नव्या मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांच्या भारत बंदच्या आवाहनाला पाठिंबा दर्शविला होता. ते देखील पंतप्रधान मोदींसोबत कृषी कायद्याचा मुद्दा उपस्थित करण्याची शक्यता आहे.

हे ही वाचा:

ठाकरे सरकारच्या काळात मराठी भाषा मंत्रालयासमोर भीक मागत उभी आहे

एअर इंडियाबाबत कोणताही निर्णय नाही

तुम्ही संपूर्ण शहराला बंदिस्त केले आहे

महाराष्ट्र मॉडेलमध्ये कोविड योद्धे संपावर

पंजाबचे माजी मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांनी दिल्लीत येऊन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांची भेट घेतल्यानंतर चन्नी यांची नवी दिल्ली भेट झाली. अमरिंदर सिंह म्हणाले की, त्यांनी अमित शहा यांच्याशी शेतीविषयक कायद्यांविषयी बोलले आणि डोवाल यांच्याशी सुरक्षेच्या मुद्द्यांवर चर्चा केली. अमरिंदरसिंग यांनी त्यांचा अपमान करणाऱ्या काँग्रेस पक्षाला सोडण्याची घोषणा केली.

Exit mobile version