ब्रिटननंतर इराणमध्येही सत्तांतर; हिझाब विरोधी नेता बनणार राष्ट्रपती

मसूद पेझेश्कियान यांची सुधारणावादी नेते म्हणून ओळख

ब्रिटननंतर इराणमध्येही सत्तांतर; हिझाब विरोधी नेता बनणार राष्ट्रपती

ब्रिटनमध्ये पार पडलेल्या निवडणुकीनंतर तब्बल १४ वर्षांनंतर सत्तांतर झाले आहे. लेबर पक्षाचे केअर स्ट्रॅमर यांनी बाजी मारली आहे. ब्रिटननंतर कट्टरपंथी इराणमधील निवडणुकीचा निकाल हाती आला आहे. तिथेही सत्तांतर झाले असून कट्टरवादी सईद जलीली यांचा पराभव झाला आहे. काही महिन्यांपूर्वी हेलिकॉप्टर अपघातात इब्राहिम रईसी यांचा मृत्यू झाला होता. यामुळे इराणमध्ये मुदतपूर्व निवडणूक घेण्यात आली होती. यामध्ये मसूद पेझेश्कियान यांचा विजय झाला आहे.

इराणमध्ये मसूद पेझेश्कियान हे देशाचे नववे राष्ट्रपती असणार आहेत. त्यांनी कट्टरतावादी नेते सईद जलिली यांचा ३० लाखांहून अधिक मतांनी पराभव केला. इराणमध्ये शुक्रवारी (५ जुलै) दुसऱ्या टप्प्यातील मतदान झाले. यामध्ये सुमारे तीन कोटी लोकांनी मतदान केले आहे. इराणचे राज्य माध्यम IRNA नुसार, पेझेश्कियान यांना १६.४ दशलक्ष मते मिळाली, तर जलिली यांना १३.६ दशलक्ष मते मिळाली.

मसूद पेझेश्कियान यांच्या विजयाची चाहूल लागताच समर्थकांनी रस्त्यावर उतरून जल्लोष साजरा केला. राष्ट्रपतीच्या मृत्यूनंतर ५० दिवसांच्या आत इराणमध्ये निवडणूक घ्यावी लागते. रईसी हे सुप्रिम लीडर आयतुल्ला अली खामेनेई यांचे निकटवर्तीय होते. जलीली देखील खामेनेई यांच्या विश्वासातील होते. त्यांचा पराभव झाला आहे.

हे ही वाचा:

पुण्यात महिला वाहतूक पोलीसाच्या अंगावर पेट्रोल ओतून जाळण्याचा प्रयत्न

‘सनातन’वरील पुस्तक शुभशकून ठरला!

तामिळनाडू बसपाच्या प्रदेशाध्यक्षांची धारदार शस्त्राने हत्या

जोगेश्वरी भूखंड घोटाळा प्रकरणी रवींद्र वायकरांना क्लीनचीट

ताब्रिझचे खासदार मसूद पेझेश्कियान यांना संयमी नेता म्हणून ओळखले जाते. लोक मसूद पेझेश्कियान यांच्याकडे सुधारणावादी नेता म्हणून पाहत आहेत. माजी राष्ट्राध्यक्ष हसन रुहानी यांचे निकटवर्तीय मानले जातात. मसूद पेझेश्कियान हे माजी सर्जन असून सध्या देशाचे आरोग्य मंत्री आहेत. त्यांनी अनेकवेळा वादविवादांमध्ये हिजाबला विरोध केला आहे.

Exit mobile version