महाराष्ट्रातील विधानपरिषदेच्या नागपूरच्या जागेवर भाजपच्या चंद्रशेखर बावनकुळे यांचा विजय झाला आहे. चंद्रशेखर बावनकुळे यांना ३६२ मते मिळाली असून त्यांनी नागपूरच्या जागेवर बाजी मारली आहे. छोटू भोयर यांच्या जागेवर अपक्ष उमेदवार मंगेश देशमुख यांना काँग्रेसने पाठिंबा दिला होता. मात्र, त्यांचा पराभव झाला असून त्यांना १८६ मते मिळाली आहेत. चंद्रशेखर बावनकुळे यांनी २७८ मतांचा कोटा पूर्ण केला आहे.
भाजपने गिरीश व्यास यांच्याऐवजी माजी ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना संधी दिली होती. भाजपमधून आलेले नगरसेवक डॉ. रवींद्र उर्फ छोटू भोयर यांना काँग्रेसकडून तिकीट देण्यात आले होते. मात्र, नंतर मतदार फुटू नये म्हणून भाजपने मतदारांना सहलीवर पाठवले. मतदारांना सहलीवर पाठवत मतदार एकत्रित ठेवत मतदार फुटणार नाहीत याची काळजी भाजपकडून घेण्यात आली.
हे ही वाचा:
श्रीनगरमध्ये पोलिसांच्या ताफ्यावर गोळीबार; दोन पोलीस शहीद
श्रीनगरमध्ये २ दहशतवाद्यांना कंठस्नान
मोदींनी कशी विश्वनाथ मंदिरातून, नागरिकांकडे ‘या’ तीन प्रतिज्ञा मागितल्या
प्रजासत्ताक दिनाला पाच मध्य आशियाई देशांना निमंत्रण
त्यानंतर मतदानाच्या आदल्या दिवशी काँग्रेस प्रदेशाध्यक्षांनी पत्रक काढत अपक्ष उमेदवार मंगेश देशमुख यांना पाठिंबा जाहीर केला. काँग्रेसच्या नेत्यांमध्येच उमेदवारीवरुन दोन गट पाहायला मिळाले. चंद्रशेखर बावनकुळे यांच्या विजयाने अत्यंत आनंद झाल्याचे भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी ‘टीव्ही ९’शी बोलताना सांगितले. बावनकुळे यांनी संयम ठेवला त्याचं त्यांना फळ मिळाले आहे, असे चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.