25 C
Mumbai
Tuesday, December 24, 2024
घरराजकारणउद्धव ठाकरे, अहंकाराच्या नशेत झिंगून देवेंद्र फडणवीसांवर टीका करतायत

उद्धव ठाकरे, अहंकाराच्या नशेत झिंगून देवेंद्र फडणवीसांवर टीका करतायत

चंद्रशेखर बावनकुळेंचे उद्धव ठाकरेंवर टीकास्त्र

Google News Follow

Related

‘सामना’च्या अग्रलेखातून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करण्यात आली आहे. देवेंद्र फडणवीस हे ‘उप’मुख्यमंत्री झाल्याने असंवेदनशील, अहंकाराचे महामेरू बनले आहेत. फडणवीस, सांभाळा! असे ‘सामना’ वृत्तपत्रात म्हणण्यात आले आहे. त्यावरून भाजपाने आक्रमक भूमिका घेतली आहे. भाजपा नेत्यांनी उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांच्यावर टीकेची झोड उठवली आहे. भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी टीका केली आहे.

‘सामना’ वृत्तपत्राच्या विरोधात तक्रार करणार असून दोन्ही प्रकारच्या लढाईची आमची तयारी सुरु आहे. न्यायालयीन लढाई आणि रस्त्यावरच्या लढाईसाठी तयार आहोत. स्वातंत्र्याच्या बाहेर जाऊन जे लिहिलं जातंय. ते खपवून घेण्यासारखे नाही. त्यामुळे आम्ही त्यांच्या विरोधात न्यायालयात जाणार आहोत, असं चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटले आहे.

उद्धव ठाकरेंना जे बोलायचं असतं, ते सामनातून आणि संजय राऊतांच्या माध्यमातून बोलतात. सत्ता गेल्यापासून उद्धव ठाकरे बावचळले आहेत. त्यांचे डोकं काम करत नाही. ठाकरेंकडून पक्ष आणि चिन्ह दोन्ही गेलं. राष्ट्रवादी देखील भाजपासोबत आली आहे. आता ते सत्तेत येऊ शकत नाही हे त्यांचे दु:ख आहे. म्हणून यापद्धतीने ते मुखपत्रातून टीका करत आहेत, अशी टीका बावनकुळे यांनी केली आहे.

हे ही वाचा:

फोन करत मुख्यमंत्र्यांना केला सॅल्युट; पोलीस अधिकाऱ्यावर कारवाई

अंतिम पंघलने पुन्हा जिंकले विश्वविजेतेपद; २० वर्षांखालील किताब सलग दुसऱ्यांदा पटकावला

दत्तक हिंदू मुलांवर धर्मांतरासाठी दबाव, १७ वर्षाच्या मुलीवर बलात्कार

हिमाचल मधील ११ हजार घरांचे नुकसान; राष्ट्रीय आपत्ती घोषित करण्याची मागणी !

चंद्रशेखर बावनकुळे यांनी ट्विट करत देखील उद्धव ठाकरे आणि संजय राऊतांवर निशाणा साधला आहे. “किंचित सेनेचे पक्षप्रमुख आणि वैफल्यग्रस्त उद्धव ठाकरे यांच्या सांगण्यावरून बोरूबहाद्दर संजय राऊत यांनी सामनातून देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात गरळ ओकली. २०१९ साली ज्यांनी भाजपासोबत गद्दारी केली, स्वतःच्या खुर्चीसाठी वडिलांच्या हिंदुत्ववादी धोरणाला पायदळी तुडवलं. ते उद्धव ठाकरे खरे गद्दार आहेत, हे महाराष्ट्रातील जनतेनं ओळखलं आहे,” अशी सणसणीत टीका त्यांनी केली आहे.

उद्धव ठाकरे यांच्या अहंकाराची सत्ता उलथून देवेंद्र फडणवीस पुन्हा एकदा सत्तेत आले आहेत. हे सत्य त्यांना अजूनही पचत नाही म्हणून आजही ते ग्लानीत आहेत. ‘सुंभ जळाला तरी पिळ कायम’ या म्हणीप्रमाणे उद्धव ठाकरे यांच्या अहंकाराचा पिळ कायम आहे. म्हणूनच अहंकाराच्या नशेत झिंगून ते फडणवीस यांच्यावर टीका करत आहेत. पण हा जळफळाट फार काळ राहणार नाही, कारण येणाऱ्या निवडणुकीत जनता उरल्या सुरल्या अहंकाराची लंका जाळून टाकेल. तोवर जनतेच्या पैशातून बांधलेल्या मातोश्री- २ मध्ये तुम्ही आणि बोरूबहाद्दर राऊत टोमणे मारत बसा,” असा सणसणीत टोला चंद्रशेखर बावनकुळे यांनी उद्धव ठाकरेंना लगावला आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
216,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा