हर्षवर्धन सपकाळ यांनी पोरकटपणा सोडावा, अजून ते लहान आहेत…बावनकुळेंचा चिमटा

अहिल्यानगरमधील राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीवरील खर्चाचा मुद्दा

हर्षवर्धन सपकाळ यांनी पोरकटपणा सोडावा, अजून ते लहान आहेत…बावनकुळेंचा चिमटा

अहिल्यानगर येथे होत असलेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीसाठी १५० कोटींचा खर्च करण्यात येणार असल्याच्या बातमीने खळबळ उडाली. प्रत्यक्षात त्यात काही तथ्य नाही असेच समोर आले. यासंदर्भात महाराष्ट्रातील विरोधी पक्षांनी आकांडतांडव केले. मंत्रिमंडळ बैठकीसाठी एवढा खर्च कशासाठी असा सवाल उपस्थित केला. त्यावर मग वेगवेगळी स्पष्टीकरणे समोर आली.

भाजपाचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांना उत्तर देताना एवढा खर्च करण्यात आलेला नाही, ही फेक न्यूज आहे, असा पवित्रा घेतला. त्यांनी आपल्या एक्स अकाऊंटवर लिहिले आहे की, सपकाळ अजून खूप लहान आहेत… मोठा पल्ला त्यांना गाठावा लागेल, पण त्यासाठी आधी पोरकटपणा सोडून द्यावा लागेल.

हे ही वाचा:

हिंदू पर्यटकांना निवडून पहलगामममध्ये दहशतवाद्यांनी घातल्या गोळ्या, २७ मृत्यू

खोट्या बातम्या थांबवा! – अमित मिश्राचा संतप्त इशारा

मुंबईत दहा कोटींच्या अफगाण चरससह दोघांना अटक

खोट्या बातम्या थांबवा! – अमित मिश्राचा संतप्त इशारा

झाले असे की, चौंडी येथील प्रस्तावित मंत्रिमंडळ बैठकीसाठी काल दि. २१ एप्रिल रोजी सार्वजनिक बांधकाम विभाग, अहिल्यानगरने एक जाहिरात प्रकाशित केली. या जाहिरातीची रिलीज ऑर्डर देताना ती दीड कोटींची असल्याचे त्यात स्पष्टपणे नमूद आहे. ती पुढारी आणि लोकमत अशा दोन वर्तमानपत्रात प्रकाशित झाली. पुढारीत ती योग्य प्रकाशित झाली आहे. पण लोकमतमध्ये शेवटच्या दोन शून्यापूर्वी असलेला टिंब अनवधानाने काढून टाकण्यात आल्याने ती १५० कोटींची दिसते. वास्तविक ही त्या वर्तमानपत्राची तांत्रिक चूक आहे. कॅामा आणि टिंब यात संबंधित वर्तमानपत्राने अनवधानाने गल्लत केल्याने असा प्रकार झाला आहे. वर्तमानपत्रांना दिलेला जाहिरातीचा रिलीज ऑर्डर किंवा संकेतस्थळावर ती बिनचूक आहे. असे असतानाही सपकाळ माध्यमांत झळकत राहण्यासाठी असा पोरकटपणा करतात तेव्हा त्यांची कीव येते. त्यांच्याबद्दल कणव व्यक्त करण्याशिवाय आणखी काही करता येईल असे वाटत नाही.

Exit mobile version