ठाकरेंचा फडणवीसांना विरोध नसता तर मराठा आरक्षण टिकलं असतं!

भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचं वक्तव्य

ठाकरेंचा फडणवीसांना विरोध नसता तर मराठा आरक्षण टिकलं असतं!

उद्धव ठाकरेंनी २०१९ मध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मुख्यमंत्रिपदाला विरोध केला नसता, तर त्यावेळी देण्यात आलेले मराठा आरक्षण सर्वोच्च न्यायालयात टिकावे यासाठी फडणवीसांनी सर्वोतोपरी प्रयत्न केले असते.देवेंद्रजींनी मराठा समाजाला न्याय मिळवून दिला असता, असा दावा भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी नागपुरात बोलताना केला आहे.

मराठा समाजाच्या आरक्षणावरून विरोधक सरकारला धारेवर धरण्याचा काम करत आहेत.मात्र, हा आरक्षणाचा मुद्दा २०१९ मधेच पार पडला असता आणि मराठा समाजाला कोणत्याही परिस्थितीत आरक्षण मिळवून दिले असते.२०१९ मध्ये उद्धव ठाकरे यांनी जर देवेंद्र फडणवीस याना मुख्यमंत्री पदापासून रोखले नसते जर त्यांनी मराठा समाजाचे आरक्षण सुप्रीम कोर्टात टिकवले असते आणि मराठा समाजाला न्याय मिळवून दिला असता, असा दावा चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला. मात्र उद्धव ठाकरेंच्या भूमिकेमुळे आज हा विषय अद्याप प्रलंबित आहे. असे असले तरी महायुतीचं सरकारच मराठ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी वचनबद्ध आहे, असं बावनकुळे म्हणाले.

हे ही वाचा:

गर्भपिशवीला टाके घालण्यासाठी आलेल्या महिला रुग्णाला दिल्या गर्भपाताच्या गोळ्या!

छगन भुजबळांना समज द्या! अजित पवारांकडे शंभूराज देसाईंची मागणी!

प्रभू श्रीराममंदिराचे १४ दरवाजे सोन्याने मढलेले

प्रदूषणाचा विळखा बसलेल्या मुंबईत दिवाळीत तीन तास फटाके फोडण्याची मुभा

मंत्री छगन भुजबळांच्या मराठा आरक्षणाबाबत संभ्रम निर्माण होत आहे.यावर बावनकुळे म्हणाले की, छगन भुजबळ यांची भूमिका सर्वपक्षीय बैठकीच्या भूमिकेसारखीच आहे, ते वेगळे काहीच बोलले नाहीत.देवेंद्र फडणवीस यांनी मराठा समाजाला ज्याप्रमाणे तत्कालिन काळत वेगळे आरक्षण दिले होते, तसेच टिकावू आरक्षण आतादेखील महायुतीचे सरकार देईल” असा मला विश्वास आहे.आम्ही कोणत्याही घटकावर अन्याय होणार नाही असे टिकावू आरक्षण मराठा समाजाला देऊ, असे बावनकुळे म्हणाले.

Exit mobile version