लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात पंतप्रधान नरेंद्र मोदी आपल्या कार्यकाळात केलेल्या कामाचा पाढा जनतेला सांगत आहेत.मात्र, अनेक लोक असे आहेत जे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भाषणाचा दुसरा अर्थ काढत आहेत.पंतप्रधान मोदींनी आपल्या कार्यकाळात प्रभू रामांचे मंदिर बांधले.त्यामुळे प्रभू राम मंदिराच्या जीर्णोद्धाराचा उल्लेख करणे साहजिकच आहे.
मात्र, धर्माच्या आधारावर पंतप्रधान मोदी मतं मागत आहेत अशी टीका विरोधक करत आहेत.उबाठा पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी देखील तशीच टीका काल( २८ एप्रिल) कोकणात केली.पंतप्रधान नरेंद्र मोदीजी निवडणुकीत रामराम करत फिरत आहेत अशी टीका उद्धव ठाकरेंनी केली.ठाकरे यांच्या टीकेवर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.औरंगजेब किंवा याकुबचा उदो उदो करण्यापेक्षा रामराम करणं कधीही चांगले, असे बावनकुळे यांनी म्हटलं आहे.
भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी ट्विट करत लिहिले की, पंतप्रधान नरेंद्र मोदीजी निवडणुकीत रामराम करत फिरत आहेत अशी टीका उद्धव ठाकरेंनी कोकणात केली. मला त्यांना सांगायचं आहे की, औरंगजेब किंवा याकुबचा उदो उदो करण्यापेक्षा रामराम करणं कधीही चांगलं.हिंदुह्रदयसम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे हिंदुत्ववादी भूमिका घेऊन जगले पण तुम्ही आता राष्ट्रविरोधी विचारांना साथ देत आहात.
हे ही वाचा:
मोदी कन्नडिगांना पापी म्हणत असणारा एडिटेड व्हिडीओ प्रियांक खरगेंकडून व्हायरल
देबश्री चौधरींचे पोस्टर लावताना भाजपा नेत्या सरस्वती सरकार यांच्यावर प. बंगालमध्ये हल्ला
काँग्रेस संपत्तीच्या वाटणीसाठी वक्फ नव्हे, अन्य समुदायांची संपत्ती घेईल
काँग्रेस खोटे बोलून करतेय लोकांची दिशाभूल, भाजपकडून आरक्षणाला धक्का नाही!
सत्ता गेल्यानंतर तुम्हाला कोकणवासीयांची आठवण झाली. अडीच वर्षे सत्तेच्या काळात कोकणला दमडीही दिली नाही. उलट चांगल्या प्रकल्पांना विरोध केला आणि ही देवभूमी विकासापासून वंचित ठेवली. आता फक्त मतं मिळविण्यासाठी तुम्हाला कोकणची आठवण झाली.
कोकण वादळात सापडलं तेव्हा तुम्ही घरात बसून होतात तर देवेंद्रजी आणि राणे साहेब कोकणात येऊन लोकांना आधार देत होते. महापूर आला तेव्हा तुमच्या लोकांनी केलेली गुंडगिरी कोकणी माणूस विसरला नाही. मोदीजी आणि नारायण राणेजींच्या प्रयत्नातून कोकणचा विकास होतोय. आता तुम्ही कितीही थापा मारल्या तरी कोकणी माणूस तुमच्या खोट्या भूलथापांना बळी पडणार नाही, असे बावनकुळे यांनी म्हटले.