विधानपरिषदेच्या निवडणुकीसाठी भारतीय जनता पार्टीकडून उमेदवारांची यादी जाहीर झाली. यामध्ये पंकजा मुंडे यांना उमदेवारी जाहीर झाली नाही. त्यावरून पंकजा मुंडेंच्या समर्थकांनी आंदोलन केले आहे. यावर भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. आंदोलन करून कार्यकर्ते पंकजा मुंडेंचं नुकसान करणार, असे वक्तव्य पाटील यांनी केले आहे.
आगामी विधान परिषद निवडणुकीसाठी भाजपाने नव्या चेहऱ्यांना संधी दिली आहे. या निर्णयाचे चंद्रकांत पाटील यांनी स्वागत केले आहे. पंकजा मुंडेंबाबत पाटील म्हणाले, पंकजा मुंडेंसाठी देवेंद्र फडणवीसांनी आणि आम्ही खूप प्रयत्न केले आहेत. मात्र मुंडे यांच्याऐवजी भाजपाकडून उमा खापरे यांना विधान परिषदेची संधी देण्यात आली आहे. पंकजा मुंडे यांच्याकडे सध्या उत्तर प्रदेशच्या सहप्रभारी म्हणून जबाबदारी पार पाडत आहेत. अजून कोणतीतरी जबाबदारी संघटनेला पंकजा मुंडे यांच्याकडे सोपवायची असु शकते, त्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे. भाजपाकडून या निर्णयाचे स्वागत आहे, असंही चंद्रकांत पाटलांनी सांगितलं.
हे ही वाचा:
१८ जुलैला होणार राष्ट्रपती पदासाठी निवडणूक
मलिक,देशमुखांची मतदानासाठी केलेली याचिका फेटाळली
सलमान खान धमकी प्रकरणी, सौरभ महाकाळची चौकशी
रोजीरोटी देईन, पाणी, रस्ते देईन तेव्हाच संभाजीनगर नाव होईल!
पंकजा मुंडे यांना उमेदवारी न मिळाल्याने त्यांच्या समर्थकांनी आंदोलन केले आहे. समर्थकांनी औरंगाबादमधील उस्मानपुरा येथील कार्यालय फोडण्याचा प्रयत्न केला. त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. मात्र मुकुंद गर्जे नावाच्या समर्थकाने विष पिण्याचा प्रयत्न केला आहे. दरम्यान, भाजपाकडून प्रवीण दरेकर, राम शिंदे, प्रसाद लाड, श्रीकांत भारतीय, उमा खापरे आणि सदाभाऊ खोत यांना उमदेवारी देण्यात आली आहे.