केंद्र सरकारने अग्निपथ योजनेची घोषणा केली आणि देशभरात काही ठिकाणी त्याविरोधात आंदोलने सुरु आहेत. याबद्दल तरुणांनी आंदोलन थांबवावे असा इशारा दिला जात आहे. आंदोलन करणारे सामान्य तरुण आहेत. त्यांना विरोधांकडून भडकवलं जात आहे. तरुण आंदोलन करून स्वतःच्या अंगावर केस घेत आहेत. अशा केस अंगावर आल्याने तरुणांना नोकऱ्या मिळताना त्यांना समस्या येणार आहेत, अशी प्रतिक्रिया भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दिली आहे.
चंद्रकांत पाटील यांची पत्रकार परिषद झाली. त्यावेळी ते अग्निपथ योजनेबद्दल सांगत होते, ते म्हणाले, योजनेमध्ये काय त्रुटी असतील तर त्या सांगाव्यात. त्या त्रुटी दुरुस्त केल्या जातील. मात्र काही न सांगता आंदोलन करणं हे चुकीचं आहे आणि याचा परिणाम तरुणांच्या नोकरीवर होऊ शकतो. त्यामुळे आंदोलन करण्यापेक्षा तरुणांनी त्रुटी सांगाव्यात, असं मतं चंद्रकांत पाटलांनी व्यक्त केले आहे.
हे ही वाचा:
काश्मीरमध्ये पोलिस निरीक्षकाची गोळ्या घालून हत्या
१०० व्या वाढदिवसानिमित्त पंतप्रधान मोदींनी घेतली आईची भेट
काँग्रेसच्या महिला आंदोलनात महिलाच गायब
मुंबई उच्च न्यायालयाच्या न्यायदालनात आत्महत्येचा प्रयत्न
अग्निपथ योजनेअंतर्गत जास्तीत जास्त २१ वयवर्षे आधी निश्चित करण्यात आलं होत. मात्र त्यानंतर लगेच २१ वरून २३ वयवर्षे निश्चित करण्यात आले आहे. तरीही तरुण आंदोलन करत आहेत. यावरून चंद्रकांत पाटील म्हणाले, तरुणांना काही समस्या आहेत तर त्यांनी चर्चा करा आणि चर्चेतून मार्ग काढू. मात्र या तरुणांना विरोधक भडकवत आहेत. त्यामुळे झोपलेल्यांना जाग करता येतं,झोपेचं सोंग घेतलेल्यांना जाग करणं कठीण असत, असा टोला चंद्रकांत पाटील यांनी विरोधकांना लावला आहे.