नरेंद्र मोदी यांनी राज्यसभेत केलेल्या भाषणावरून महाराष्ट्रात सध्या राजकारण तापले आहे. सत्ताधारी महाविकास आघाडीने नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली होती. त्यावरून भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदींवर केलेल्या टीकेवर उत्तर दिले आहे.
चंद्रकांत पाटील यांनी महसूल मंत्री काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांच्यावर निशाणा साधत त्यांना टोला लगावला आहे. तुम्ही कोरोना काळात कुठल्या बिळात लपला होता हे लोकांना माहिती आहे. कोरोना काळात भाजप कार्यकर्ते फिल्डवर होते, असे चंद्रकांत पाटील म्हणाले. कोरोना महामारीच्या काळात केंद्राच्या योजना सुरु होत्या तुम्ही लोकांना काय दिलं? असा सवाल चंद्रकांत पाटील यांनी विचारला आहे.
रेल्वे केंद्राने सोडल्या तरी तुमची जबाबदारी होती की त्या रेल्वे रिकाम्या जातील. लोकांना तुम्ही विश्वास द्यायला हवा होता. आम्ही तुमची काळजी घेऊ, आम्ही तुमचं पोट भरू हा आत्मविश्वास तुम्ही परप्रांतीय लोकांना देऊ शकला नाही हे तुमचे अपयश आहे, अशी टीका चंद्रकांत पाटील यांनी केली.
हे ही वाचा:
‘काँग्रेसचे नाव बदलून माय-लेकाची काँग्रेस असे करा’
काँग्रेस नसती तर…पंतप्रधानांनी काढले काँग्रेसचे वाभाडे!
गौतम अदानी बनले आशियाचे सर्वात श्रीमंत व्यक्ती…
महाभारत मालिकेतील ‘भीम’ प्रविणकुमार यांचे निधन
कोरोना महामारीच्या संकटात आपल्या राज्यातील नागरिकांची सेवा करण्याऐवजी आपल्या वरची जबाबदारी झटकण्यासाठी तुम्ही तुमच्या गावाला जा असे सांगण्याचा जो प्रयत्न झाला. त्या प्रयत्नांमधून लोकांची परवड झाली आणि त्या राज्यांत कोरोना संसर्ग वाढला. महाराष्ट्राच्या द्वेषाचा काही विषय नाही. महाराष्ट्र शासनाने या महामारीच्या काळात काय दिले याची श्वेतपत्रिका जाहीर करा, अशी मागणीही चंद्रकांत पाटील यांनी केली आहे.