राज्यात सध्या सत्ताधारी आणि विरोधी पक्षातील नेत्यांमध्ये आरोप प्रत्यारोपांचे सत्र सुरू आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी आज पत्रकार परिषद घेत संजय राऊत आणि ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे.
केंद्राची सुरक्षा असतानाही भाजप नेते किरीट सोमय्या यांना जीवे मारण्याचा प्रयत्न करण्यात आला, असा आरोप चंद्रकांत पाटील यांनी केला आहे. घटना शनिवारी घडली त्यावेळी सुट्टी होती. तरीसुद्धा पुणे महापालिकेत एवढा जमाव कसा जमला? असा सवाल चंद्रकांत पाटील यांनी उपस्थित केला आहे. तसेच पुणे महापालिकेत असलेल्या सुरक्षा व्यवस्थेबाबतही त्यांनी सवाल उपस्थित केला. ज्यांची घरे काचेची असतात त्यांनी दुसऱ्यांच्या घरावर दगडे मारण्याचे काम करू नये, असा टोला चंद्रकांत पाटील यांनी लगावला आहे.
घरात घुसू देणार नाही, नागपुरात फिरू देणार नाही असे वक्तव्य करत असल्याचे सांगत राज्यात टोळीचे सरकार चाललंय काय? असा प्रश्न देखील त्यांनी उपस्थित केला. तसेच या हल्ला प्रकरणाची सखोल चौकशी करण्यात व्हावी यासाठी गृहमंत्री अमित शहा यांना पत्र पाठवल्याचे चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.
हे ही वाचा:
मुंबई विद्यापीठाच्या निर्णयावर मंगेशकर कुटुंबीय नाराज
बेरोजगारी, कर्जबाजारीमुळे तीन वर्षात २५ हजार आत्महत्या
कोरेगाव-भीमा हिंसाचार प्रकरणी शरद पवार यांना समन्स
सचिन वाझे अनिल देशमुखांविरुद्ध साक्ष देणार; ईडीला लिहिले पत्र
विश्वासघात करून सत्तेत आलेल्या सरकारला आता २७ महिने होतील. या २७ महिन्यात अनेक उलथापालथ झाली. मंत्र्याना राजीनामा द्यावा लागला. “सीताराम कुंटे यांनी सरकारवर आरोप केले आहेत. परमबीर सिंह यांनी सरकारवर आरोप केले आहेत, आम्ही आरोप केले नाही. संजय राऊत म्हणत आहेत, की गुडघे टेकणार नाही. छत्रपती शिवाजी महाराजांसमोर पूर्वी गुडघे टेकले जायचे. पण आता यांची गुडघे टेकण्याची जागा बदलली आहे. आता सत्तेसाठी दुसऱ्यांसमोर गुडघे टेकले जात आहेत,” असा घाणाघात चंद्रकांत पाटील यांनी केला आहे.