राज्याच्या राजकारणात सध्या सत्ताधारी विरुद्ध विरोधी पक्षनेते असा संघर्ष चिघळलेला असताना भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधला आहे. मी एका गिरणी कामगाराचा मुलगा आहे. माझ्या घरातील कामगार बेरोजगार झाले. सर्वसामान्यांचे हाल भयानक होतील, असे वागू नका असे चंद्राकांत पाटील म्हणाले.
एसटीच्या संपाचा फटका सामान्यांना बसत आहे. सगळं श्रेय तुम्हाला घ्या, पण लोकांचे संसार उध्वस्त करू नका, असेही चंद्रकांत पाटील म्हणाले. सर्वसामान्यांचे अनेक प्रश्न प्रलंबित असूनही आमदारांना घरे कशाला द्यायला हवीत? असा सवाल चंद्रकांत पाटील यांनी विचारला आहे. आमदार पळून जातील आणि सरकार पडेल अशी भीती निर्माण झाल्यामुळे हा निर्णय घेतल्याचा टोला चंद्रकांत पाटील यांनी लगावला आहे. आमदारांना घरे देण्यापेक्षा शेतकऱ्यांना पैसे द्या, एसटी कर्मचाऱ्यांच्या मागणीकडे लक्ष द्या, असे चंद्रकांत पाटील म्हणाले.
हे ही वाचा:
“तेजस ठाकरेसुद्धा ‘त्या’ कंपनीत पार्टनर” किरीट सोमय्यांचा दावा
बायज्यूजकडे फिफा फुटबॉल विश्वचषकाचे प्रायोजकत्व
पेनड्राईव्ह बॉम्बवरून राऊतांची आगपाखड
माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांची होणार सीबीआय चौकशी
केंद्रीय तपास यंत्रणा आणि महाराष्ट्रातील विरोधी पक्षनेते यांची हातमिळवणी असून भाजपाला महाराष्ट्रातील सरकार चालू द्यायचं नाही, अशी टीका शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केली होती. त्यावर चंद्रकांत पाटील यांनी प्रतित्युर दिले आहे. संजय राऊत यांनी शिवेसेनीची वाट लावण्याचे कंत्राट घेतले आहे. एकही नेता त्यांनी सेनेत टिकू दिला नाही. सेनेतील दिग्गज नेते आज कुठे आहेत कुणाला माहिती नाही आणि हे सर्व मुख्यमंत्री हतबल होऊन पाहत आहेत हे दुर्दैव आहे, अशी टीका चंद्रकांत पाटील यांनी केली आहे.