आम्ही जंगलातल्या वाघाशी मैत्री करतो, पिंजऱ्यातल्या वाघाशी नाही

आम्ही जंगलातल्या वाघाशी मैत्री करतो, पिंजऱ्यातल्या वाघाशी नाही

वाघाशी कुणी मैत्री करत नाही, वाघ ठरवतो कुणाशी मैत्री करायची आहे, अशा शब्दात शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यावर टीका केली होती. त्यावर चंद्रकांत पाटील यांनी पलटवार केला आहे. आम्ही जंगलातील वाघाशी मैत्री करतो, पिंजऱ्यातील वाघाशी नाही, असा टोला चंद्रकांत पाटील यांनी लगावला आहे.

प्रसारमाध्यमांशी बोलताना चंद्रकांत पाटील यांनी संजय राऊत यांच्या टीकेला उत्तर दिलं. संजय राऊत यांनी मला त्यांच्या मनाविरुद्ध गोड माणूस म्हटलंय. हरकत नाही. पण आमची दोस्ती जंगलातल्या वाघाशी होती. आताचा वाघ पिंजऱ्यात आहे. पिंजऱ्यातील वाघाशी आम्ही मैत्री करत नाही, असा टोला पाटील यांनी लगावला.

आज माझा वाढदिवस आहे. त्यामुळे कटू बोलायला नको. त्यांनीही आज मनाविरुद्ध का असेना पण मला शुभेच्छा दिल्या आहेत. राऊतांचं म्हणणं खरं आहे. आम्ही जंगलातल्या वाघाशी मैत्री करतो. पिंजऱ्यातल्या नाही. जोपर्यंत ते जंगलात होते, तोपर्यंत आमची मैत्री होती. आता ते पिंजऱ्यात आहेत, असं ते म्हणाले. निवडणुकांवरही त्यांनी भाष्य केलं. लढायचंच असेल तर एकटं एकटं लढा. म्हणजे कोणाची किती ताकद आहे हे समजेलच, असं आव्हानही त्यांनी आघाडीला दिलं. तसेच प्रत्येक पक्ष आपआपल्या पद्धतीने पक्ष वाढवण्यासाठी काम करत असतो. त्यामुळे मी त्यावर काही बोलणार नाही, असंही ते म्हणाले.

हे ही वाचा :

… की महानगरपालिकेला आणखीन बळी हवे आहेत?

प्रशांत किशोर-शरद पवार भेट आज सिल्वर ओकवर

अजितदादा आणि पत्रकारांची गळचेपी

४७ व्या जी-७ परिषदेत पंतप्रधान मोदी होणार सहभागी

यावेळी त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावरही टीका केली. अजितदादांना संजय राऊतांचा गुण लागलेला दिसतोय. त्यांच्यावर राऊतांची सावली पडली, गुण लागला, अशी टीका त्यांनी केली. खासदार गिरीश बापट हे पुण्याचे नेते आहेत. त्यांच्याच नेतृत्वात पुणे महापालिकेची निवडणूक लढवली जाणार असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं.

Exit mobile version