महाराष्ट्राच्या राजकारणात ज्या घडामोडी घडत आहेत. त्यावर राजकीय स्तरावर अनेक प्रतिक्रिया येत आहेत. भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी या सर्व घडामोडीवर प्रतिक्रिया दिली आहे. राज्यातील घटनांशी भाजपाचा काहीही संबंध नाही, असे चंद्रकांत पाटील यांनी स्पष्ट सांगितले आहे.
भाजपाने विधान परिषद निवडणुकीत मोठा विजय मिळवला, त्याचाच सध्या आम्ही आनंद साजरा करत आहोत. अनेक लोक विरोधी पक्षनेते देवेंद्र फडवणीस यांना विजयी झालो म्हणून भेटायला येत आहेत. त्यामुळे शिवसेनेत काय घडामोडी सुरु आहेत, हे आम्हाला माहिती नाही. याच्याशी भाजपाचा संबधी नाही. शरद पवार आणि संजय राऊत याना अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे. त्यामुळे ते काहीही बोलू शकतात. ही त्यांची परस्पर भूमिका आहे. याच्याशी आमचा काहीही संबंध नाही, असे चंद्रकांत पाटील म्हणाले आहेत.
भाजपा नेते मोहित कंबोज हे एकनाथ शिंदे सुरतमध्ये असताना दिसले होते. त्यावर हे भाजपाने केलं असं विरोधक म्हणत होते. त्यावरसुद्धा चंद्रकांत पाटील यांनी स्पष्टीकरण दिले आहे. ते म्हणाले, मोहित कंबोज हे सर्व पक्षाचे मित्र आहेत. त्यांच्या अनेक पक्षात मित्र आहेत. राजकारण वेगळं आणि मित्र असंण वेगळं एकनाथ शिंदेसुद्धा त्यांचे मित्र आहेत. त्यामुळे मित्र म्हणून भेटले असतील त्यांना, असे ते म्हणाले.
हे ही वाचा:
एकनाथ शिंदे यांच्यासोबत ३७ शिवसेना आमदार, यादी जाहीर
महाराष्ट्राच्या राजकीय घडामोडींवर आसामच्या मुख्यमंत्र्यांचं मोठं वक्तव्य
यावेळी चंद्रकांत पाटील यांनी संजय राऊत यांच्यावर टीका केली आहे. ते म्हणाले, संजय राऊत हे सकाळी एक बोलतात आणि दुपारी वेगळं बोलतात. संजय राऊत हेच एकेदिवशी शिवसेना संपवणार आहेत, असा आरोप चंद्रकांत पाटील यांनी केला आहे.