भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि अन्य भाजपा नेत्यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली. शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांच्या छाबय्या विहंग गार्डनच्या दंडमाफी प्रकरणावरून भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील व अन्य भाजपा नेत्यांनी शनिवार २२ जानेवारी रोजी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेऊन, त्यांना याबाबत निवेदन सादर केले.
राज्यापालांची भेट घेतल्यानंतर माध्यमांशी बोलताना भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील म्हणाले की, ”नऊ मजली इमारत अधिकृत आणि चार मजले अनधिकृत अशा इमारतीवर बसलेला ४ कोटी ३० लाख हा दंड आणि व्याज मंत्रीमंडळ बैठकीत माफ करण्यात आला. ही अत्यंत बेकायदेशीर आणि घटनेच्याविरोधी आहे, असे चंद्रकांत पाटील म्हणाले. मंत्रीमंडळाने शपथ घेताना अशी शपथ घेतलेली असते, की आम्ही कोणाही एका व्यक्तीला लाभ होईल असे वर्तन करणार नाही. जर अशाप्रकारे अनधिकृत बांधकामांचा दंड माफ करायचे असतील, तर ते संपूर्ण महाराष्ट्राचे धोरण ठरले पाहिजे. हा एका अर्थाने आमदार प्रताप सरनाईक यांना फायदा होण्यासाठी घेतलेला निर्णय आहे, असे चंद्रकांत पाटील म्हणाले.
हे ही वाचा:
प्रजासत्ताक संचलनात आदिवासी चित्रकलेचे दर्शन
कमला इमारत अग्नितांडवात ७ जणांचा मृत्यू; १८ जण जखमी
मुंबईतील भाटिया रूग्णालयाजवळील इमारतीला भीषण आग; १५ जखमी
एन्काउंटर स्पेशालिस्ट ए ए खान यांचे निधन
या प्रकरणी संपूर्ण मंत्रीमंडळाविरोधात एफआयआरची नोंद करावी व मंत्रीमंडळ बरखास्त करावे अशी देखील मागणी केली. राणीच्या बागेतील परदेशी प्राण्यांच्या कंत्राटामध्ये घोटाळा झाल्याचे आरोप भाजपा आमदार मिहीर कोटेचा यांनी केला होता. या भ्रष्टाचारप्रकरणी उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करणार असल्याचे चंद्रकांत पाटील यांनी केले आहे. राणी बागेचे प्राण्यांचे वास्तू बनवण्यासाठीचा १०६ कोटी कंत्राटप्रकरणी झालेल्या भ्रष्टाचारात सहभागी असलेल्यांची नावे बाहेर काढणार असल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. याप्रकरणी लोकायुक्तांकडे तक्रार करून उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.