संजय राऊत हे साधे नगरसेवकही नाहीत

संजय राऊत हे साधे नगरसेवकही नाहीत

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंबद्दल केलेलं वक्तव्य, त्यानंतर केंद्रीय मंत्री नारायण राणेंना झालेली अटक आणि सुटका, या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकीय वातावरण तापलं आहे. त्यानंतर शिवसेना आणि भाजपा नेत्यांमध्ये आरोप-प्रत्यारोप आणि इशारा मालिका सुरु झालीय. शिवसेना खासदार संजय राऊत हे साधे नगरसेवकही झाले नाहीत. त्यांनी कोण शाहणं आणि कोण वेडं हे ठरवू नये. ते मतपेटीतून लोक ठरवतील, असा टोला चंद्रकांत पाटील यांनी लगावलाय. तर अनिल परब यांच्या विरोधात तक्रार तयार झाली आहे. प्रो ऍक्टिव्हली स्वत:हून ऍक्शन होण्याची शक्यता आहे, आम्ही त्याची वाट पाहतोय. अन्यथा आम्ही लवकरच तक्रार करु, असा इशारा चंद्रकांत पाटील यांनी दिलाय.

सुप्रिया सुळे कधीपासून युतीच्या प्रवक्त्या झाल्या असा सवालही पाटील यांनी यावेळी केलाय. शिवसेना-भाजप युतीची शक्यता नसल्याचंही त्यांनी यावेळी स्पष्ट केलं. केंद्रानं मराठा आरक्षण प्रश्नी सर्व प्रश्न सोडवले आहेत. आता अनेक गोष्टी राज्य सरकारच्या हातात आहेत. त्यामुळे त्या प्रश्नांची सोडवणूक राज्य सरकारनं करणं गरजेचं असल्याचं पाटील यावेळी म्हणाले. एकनाथ खडसे यांच्यावर सक्तवसुली संचलनालयने (ईडी) कारवाई सुरु केली आहे. सीडी लावायचा निर्णय आता त्यांनीच घ्याव. मात्र, भाजपामध्ये कुणी चुकीचं वागलं तर त्याच्यावर कारवाई होतेच, असा टोला पाटील यांनी खडसेंना लगावलाय.

खासदार संजय राऊत यांनी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना जोरदार प्रत्युत्तर दिलंय. शिवसेना आणि नेत्यांची सगळी प्रकरणं मी हळूहळू बाहेर काढतो, असा उघड इशारा नारायण राणे यांनी दिला होता. त्यावर आम्ही सभ्यपणा पाळतोय, पण कुंडल्या आमच्याकडेही आहेत, आम्ही देखील संदूक उघडू शकतो हे लक्षात ठेवा, असं प्रत्युत्तर राऊतांनी राणेंना दिलं आहे. संजय राऊत आज नाशिक दौऱ्यावर आहेत. महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राऊतांचा नाशिक दौरा महत्त्वाचा आहे. आज शिवसेनेच्या कार्यक्रमात राऊतांनी राणेंचे अक्षरश: वाभाडे काढले तसंच जे वादळ उठलंय ते अद्याप संपलेलं नाही, असं म्हणत राणेंना एकप्रकारे इशाराच दिला.

हे ही वाचा:

भारताचे धुरंधर ढेपाळले, भारताचा दारुण पराभव

पॅरालिम्पिकमध्ये सुवर्ण पदकापासून भारत एक पाऊल दूर

काय आहे मोदी सरकारने आणलेली भारत सिरीज?

पानिपत होण्याच्या भीतीनेच ठाकरे सरकार निवडणुका पुढे ढकलत आहे

शिवसेना-भाजपाचे नेते भेटतात, त्यात काही चुकीचं नाही. राजकारणापलीकडे वैयक्तिक संबंध जपण्याचे संस्कार माझ्यावर झाले आहेत. शिवसेना-भाजपाचे नेते भेटले की लगेच युती व्हायला ती काही इन्स्टंट कॉफी नाही आणि अशा घटनांवर तातडीनं प्रतिक्रिया द्यायाला माझं आयुष्य काही ब्रेकिंग न्यूज नाही’, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या होत्या. त्यावरुन पाटील यांनी सुप्रिया सुळेंना प्रत्युत्तर दिलं आहे.

Exit mobile version