33 C
Mumbai
Monday, November 18, 2024
घरराजकारणराऊतसाहेब...भोक तुमच्या फुग्याला पडलंय

राऊतसाहेब…भोक तुमच्या फुग्याला पडलंय

Google News Follow

Related

भारतीय जनता पार्टीचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील यांनी शिवसेना आणि संजय राऊत यांच्यावर हल्लाबोल केला आहे. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या अटक प्रकरणावरून चंद्रकांत पाटील यांनी आक्रमक भूमिका घेत विरोधकांवर निशाणा साधला आहे. यावेळी त्यांनी शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनाच्या अग्रलेखातून नारायण राणेंवर करण्यात आलेल्या टीकेचाही चांगला समाचार घेतला आहे.

महाराष्ट्रात सध्या केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना झालेली अटक हा राजकारणाचा केंद्रबिंदू ठरला आहे. राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या विरोधात केलेल्या वक्तव्यामुळे त्यांच्यावर गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली. या अटकेनंतर राज्यातील सत्ताधारी शिवसेनेने राज्यात कायदा हातात घेत आंदोलन करायला सुरुवात केली. राज्यभरात अनेक ठिकाणी भाजपाच्या कार्यालयांवर दगडफेक केली गेली. तर भाजपा कार्यकर्त्यांवरही हल्ले करण्यात आले.

आज शिवसेनेच्या अग्रलेखातूनही नारायण राणे यांच्यावर टीका करताना त्यांना भोक पडलेला फुगा म्हटले गेले. या साऱ्यावरूनच भाजपा महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील यांनी ठाकरे सरकारवर पलटवार केला आहे. ट्विटरच्या माध्यमातून पाटील यांनी टीकास्त्र डागले आहे.

हे ही वाचा:

‘महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट हाच एकमेव मार्ग!’

भारतात कोरोना संदर्भात ‘ही’ दिलासादायक बातमी

लीड्सवर भारत ‘लीड’ वाढवणार?

नारायण राणे यांचं काही चुकलं नाही

काय म्हणाले चंद्रकांत पाटील?
अनिल परब यांच्याबाबत आम्ही कोर्टात याचिका करणार आहोत. त्यांची क्लिप काल जगानं पाहिली. किती कायदा हातात घेणं चाललंय? किती अरेरावी चाललीये? पोलिस आणि गुंडांच्या बळावर हे सरकार चाललंय. त्यामुळे ती क्लिप घेऊन आम्ही न्यायालयात जातोय.

स्वातंत्र्याला ७५ वर्षे झाली हा संदर्भ देताना मुख्यमंत्री उद्धवजी चुकले, हे झाकण्यासाठी सगळा खटाटोप सुरू आहे. मारण्यासाठी मातोश्रीवर जाईन, शोधून मारेन असं काहीही राणेसाहेब म्हणालेले नव्हते. एखाद्या वाक्याबाबत समजावण्याची व्यवस्था आहे. पण इतकं टोक गाठणं चुकीचं आहे.

ज्या एका वाक्यावरून इतका कोलाहल निर्माण केला, ते वाक्य काय आहे? पण मुख्यमंत्री उद्धवजींनी स्वातंत्र्याबाबतचा संदर्भच चुकवला. त्यांना अजिबात ज्ञान नाही. त्यामुळे त्यांना खुर्चीवर बसण्याचा अधिकारही नाही. ते राहिलं बाजूलाच, उलट ते झाकण्यासाठी राणे राणे जप करत अटकेचं सूडनाट्य रचलं.

भोक तुमच्या फुग्याला पडलंय. राऊतसाहेब, आरोप करणाऱ्या महिलेलाच तुम्ही जेलमध्ये डांबता. सत्तेचा दुरुपयोग करता. उपसभापती असूनही नीलमताई शिवसेना प्रवक्त्यासारखं बोलतात. त्यांनाही आम्ही न्यायालयात खेचणार आहोत. त्या उपसभापती असूनही राणेंना दुतोंड्या कसं म्हणतात, हे कोर्टातच विचारू.

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या प्रकृतीबाबत मी कुटुंबीयांशी संपर्कात आहे. वैद्यकीय उपचार मिळत असल्याने त्यांची प्रकृती आता स्थिर आहे. थोडीशी विश्रांती घेऊन लढाऊ राणेसाहेब पुन्हा त्याच तडफेने काम करू लागतील, असा विश्वास मी महाराष्ट्राला देतो.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
191,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा