ठाकरे गटाच्या चंद्रकांत खैरे यांच्या मुलाची ऑडिओ क्लिप का होतेय व्हायरल?

ऋषीकेश खैरेंची ऑडिओ क्लिप व्हायरल

ठाकरे गटाच्या चंद्रकांत खैरे यांच्या मुलाची ऑडिओ क्लिप का होतेय व्हायरल?

ठाकरे सरकारमध्ये शासकीय बदल्यांसाठी पैशांचे व्यवहार होत असल्याचा दावा ‘देवेंद्र फडणवीस’ यांनी केला होता. आता याबाबतची एक ऑडियो क्लिप व्हायरल झाली आहे.  ठाकरे सरकारमध्ये शासकीय बदल्यांसाठी पैशांचे व्यवहार होत असल्याचा आरोप तत्कालिन विरोधी पक्षनेते  देवेंद्र फडणवीस यांनी केला होता.

दरम्यान,आता शिवसेनेचे औरंगाबादचे माजी खासदार चंद्रकांत खैरे यांचा मुलगा ऋषिकेश खैरे यांनी शासकीय बदलीसाठी दोन लाख रुपयांचा व्यवहार केल्याचा दावा एका ऑडियो क्लिपमध्ये करण्यात आला आहे.  ही ऑडियो क्लिप सध्या सोशल मिडीयावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

व्हायरल ऑडियो क्लिपमध्ये वन खात्याच्या बदलीसाठी एका व्यक्तीकडून ऋषिकेश खैरे यांनी ठाकरे सरकार सत्तेत असताना दोन लाख रुपये घेतल्याचं सांगण्यात येत आहे. मात्र बदलीचे काम झालं नसल्यानं, सदरील व्यक्ती पैसे परत मागत आहे. पण पैसे देण्यासाठी ऋषिकेश टाळाटाळ करत असल्याचं संभाषणात ऐकू येत आहे. इतकंच नाही तर संबंधित व्यक्तीनं ऋषिकेश खैरे यांच्याकडून काम झालं नसल्यानं दुसरीकडेही पैसे देऊन व्यवहार केल्याचं या ऑडियो क्लिप मधून समोर येत आहे.

ती व्यक्ती मी घरातील सोनं-चांदी विकून दोन लाख रुपये दिले होते, तुम्ही कामही केले नाही आणि पैसेही परत देत नाहीत, त्यामुळे मी खूप अडचणीत आलो आहे. तुम्ही मला हलक्यात घेत आहात, आता एकच तारीख सांगा आणि माझे पैसे मला परत द्या, अशी मागणी सदर व्यक्ती करत आहे. तर त्या व्यक्तीला डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात शंभर टक्के पैसे देवून टाकतो, असे खैरे सांगत आहेत.

हे ही वाचा:

पद्म पुरस्कारांचा दाखला देत मोदींनी केले आदिवासी समाजाचे कौतुक

शनि शिंगणापूरला १ कोटीचे दान करणारे ओदिशाचे मंत्री नबा दास गोळीबारात मृत्यूमुखी

पवारांच्या भाकितांचे रहस्य काय?

केरळचे राज्यपाल आरिफ मोहम्मद खान म्हणतात, मी हिंदूच!

या क्लिपवर ऋषिकेश खैरे काय म्हणाले?

ही क्लिप आपलीच असल्याच ऋषिकेश खैरे यांनी मान्य केलं असून बदलीचा विषय वेगळा आणि पैशांचा व्यवहार वेगळा असल्याचा खुलासा त्यांनी केला आहे. आमच्या मित्रांमध्ये पैशांचे व्यवहार चालू असतात. ठाकरे सरकार चालू असताना एका मित्रामार्फत संबंधित व्यक्ती माझ्याकडे आले होते.

Exit mobile version