चंद्राबाबू म्हणतात, दोन हजार नोटांवरील बंदीचा निर्णय उत्तम

रिझर्व्ह बँकेने २ हजार रुपयांच्या नोटांबाबत घेतलेल्या निर्णयाचे स्वागत

चंद्राबाबू म्हणतात, दोन हजार नोटांवरील बंदीचा निर्णय उत्तम

आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि तेलुगू देसम पक्षाचे प्रमुख चंद्राबाबू नायडू यांनी दोन हजार रुपये चलनाच्या नोटा बाद करण्याच्या रिझर्व्ह बँकेच्या निर्णयाचे स्वागत केले आहे.

 

‘दोन हजार रुपये नोटांवरील बंदीचा निर्णय हे चांगले लक्षण आहे. डिजिटल करन्सीबाबत मी यापूर्वीच माझा अहवाल सादर केला होता. आता या नोटांवरील बंदीमुळे भ्रष्टाचाराला आळा बसेल. राजकारणी लोक मतदारांना पैशांचे वाटप करून निवडणूक जिंकण्याचा प्रयत्न करत असत. त्यात दोन हजार रुपयांच्या नोटा प्रामुख्याने होत्या. आता आरबीआयच्या या निर्णयामुळे यावर नियंत्रण येईल,’ अशी आशा त्यांनी व्यक्त केली आहे.

 

सध्या नायडू हे उत्तर आंध्र दौऱ्यावर आहेत. येथील अनाकापल्ले येथे नागरिकांना संबोधित करताना त्यांनी नोटाबंदीच्या निर्णयामागील आपली भूमिका विशद केली. यावेळी त्यांनी वाढते इंधनदर आणि अन्य वस्तूंच्या गगनाला भिडणाऱ्या किमतींबाबत चिंता व्यक्त केली. याविरोधात आवाज उठवणाऱ्यांवर खोटे गुन्हे दाखल केले जातात, असेही नायडू म्हणाले. त्यांनी त्यांच्या रोडशोला होणाऱ्या गर्दीबाबतही आनंद व्यक्त केला.

हे ही वाचा:

समीर वानखेडे यांना हायकोर्टाकडून दिलासा !

अदानी उद्योग समूहाला सर्वोच्च न्यायालयाच्या समितीची क्लीन चिट !

मिनी नोटबंदी; २००० च्या नोटा ३० सप्टेंबर नंतर बंद

उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांनी धर्मांतर केले आहे

विरोधी पक्षांच्या नेत्यांना अशाप्रकारे रोड शो घेण्याचा अधिकार आहे, असेही ते म्हणाले. आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री राजधानी अमरावती आणि विशाखापट्टणम् येथील ऋषीकोंडा येथील जमीन विकण्याचा सर्वतोपरी प्रयत्न करत असल्याचा आरोपही त्यांनी केला. मुख्यमंत्री जगन यांना तुमच्याबद्दल प्रेम नाही तर तुमच्या जमिनीबद्दल आहे, अशी टीका त्यांनी केली. त्यांनी तरुणांना नोकऱ्या देण्याचे आश्वासनही दिले.

Exit mobile version