नवाब मलिक यांना चांदीवाल आयोगाचे समन्स

नवाब मलिक यांना चांदीवाल आयोगाचे समन्स

राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांच्या अडचणींमध्ये आता आणखी वाढ झाली आहे. नवाब मलिक यांना चांदिवाल आयोगाने समन्स पाठवले आहे. मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह आणि सचिन वाझे यांच्यासंदर्भात केलेल्या वक्तव्यावर खुलासा करण्यासाठी नवाब मलिक यांना समन्स पाठवण्यात आले आहे.

सचिन वाझे आणि परमबीर सिंह हेच अँटिलिया केसचे मास्टरमार्ईंड असल्याचा दावा नवाब मलिक यांनी केला होता. त्यांच्या याच वक्तव्यावर चांदीवाल आयोगाने त्यांना समन्स पाठवले आहे. नवाब मलिक यांनी त्यांनी केलेल्या वक्तव्यावर खुलासा द्यावा असे चांदीवाल आयोगाने म्हटले आहे. त्यासाठी त्यांना १७ फेब्रुवारी रोजी हजर राहण्याचे आदेश देखील देण्यात आले आहेत. सचिन वाझे याने त्याच्या वकिलाच्या माध्यमातून काही माध्यमांनी प्रसिद्ध केलेल्या बातम्या चांदीवाल आयोगासमोर सादर केल्या होत्या.

हे ही वाचा:

भारतीय नागरिकांनाही युक्रेनमधून बाहेर पडण्याचे आदेश

कोविड जम्बो सेंटर घोटाळ्याप्रकरणी सोमय्यांनी केली ८९ पानांची तक्रार

दाऊदची बहीण हसिना पारकरच्या मालमत्तेवर ईडीची धाड

‘भारतातल्या बनावट आंदोलकांना समर्थन देणारे, मिठ्या मारणारे, लिबरल्स गारठलेत’

उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या अँटिलिया या निवासस्थानाबाहेर जी स्फोटके ठेवण्यात आली होत, त्या प्रकरणाचे मास्टरमार्ईंड परमबीर सिंह हेच असून राष्ट्रीय तपास यंत्रणा एनआयए त्यांना वाचवण्याचा प्रयत्न करत आहे, असा गंभीर आरोप नवाब मलिक यांनी केला होता. सचिन वाझे हा परमबीर सिंह यांच्याच टोळीचा भाग आहे, असेही ते म्हणाले होते. अँटिलिया प्रकरणानंतर बदली झाल्यानंतर परमबीर सिंह यांनी खोटे आरोप करुन अनिल देशमुख आणि महाविकासआघाडी सरकारला बदनाम केले, असे नवाब मलिक यांनी म्हटले होते.

Exit mobile version