अनिल देशमुखांना मुख्यमंत्री मदत निधीत भरावे लागणार ५० हजार

अनिल देशमुखांना मुख्यमंत्री मदत निधीत भरावे लागणार ५० हजार

माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना चांदिवाल आयोगाने दंड ठोठावला आहे. मंगळवारी होणाऱ्या सुनावणीमध्ये सचिन वाझेची उलट तपासणी होणार होती. ज्यासाठी अनिल देशमुख आणि सचिन वाझे या दोघांनाही जेल प्रशासनाने आयोगापुढे हजर केले होते. मात्र, सचिन वाझेची उलट तपासणी घेण्यासाठी अनिल देशमुखांचे वकीलच उपस्थित नसल्याने आयोगाचे मंगळवारचे कामकाज रखडले. आयोगाचा वेळ खर्ची पडल्याबद्दल अनिल देशमुखांना ५० हजारांचा दंड ठोठावण्यात आला.

अनिल देशमुख यांचे वकील गैरहजर राहिल्यामुळे देशमुखांना हा दंड भरावा लागणार असून ही दंडाची रक्कम मुख्यमंत्री मदत निधीत जमा करण्याचे निर्देश त्यांना देण्यात आले आहेत. अनिल देशमुखांना चांदिवाल आयोगाने दंड आकारण्याची ही दुसरी वेळ आहे. यापूर्वी त्यांच्या वकिलांनी आयोगाकडे वेळ मागितल्याने अनिल देशमुखांना १५ हजारांचा दंड ठोठावला होता.

हे ही वाचा:

दिल्लीच्या मोहल्ला कमिटीच्या औषधांमुळे तीन मुले दगावली; केजरीवाल अडचणीत

शिवभोजन थाळीच्या नावावर दोन घोट ज्युस

राष्ट्रपती राजवटीच्या सर्व कारणांची महाविकास आघाडी सरकारकडून ‘पूर्तता’

‘एकटे निवडणूक जिंकता येत नाही म्हणून शिवसेनेची जोडतोड करून सत्ता’

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर एका पत्राद्वारे आरोप केले होते. सचिन वाझेमार्फत १०० कोटींची खंडणी जमा करायला सांगितल्याचा आरोप करण्यात आला होता. या आरोपांची हा चांदिवाल आयोग चौकशी करत आहे.

Exit mobile version