चंदीगडमध्ये ‘आप’चा महापौर, आठ मते ठरवली वैध

फेरफार करणाऱ्या निवडणूक अधिकाऱ्यावर कारवाई

चंदीगडमध्ये ‘आप’चा महापौर, आठ मते ठरवली वैध

चंदीगड महापौर निवडणुकीसंदर्भात सर्वोच्च न्यायालयाने मोठा निकाल दिला आहे. या निवडणुकीतील आठ मतं निवडणूक अधिकाऱ्याने खाडाखोड करून अवैध ठरवली होती, ती सर्व मतं ही सर्वोच्च न्यायालयाने वैध ठरवली आहेत. याशिवाय आप पक्षाच्या उमेदवाराला विजयी घोषित केलं आहे. फेरफार करणाऱ्या निवडणूक अधिकाऱ्यावर कारवाई करावी, असे आदेशही सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत.

महापौर आणि उपमहापौर निवडणुकीत चंदीगडमध्ये मोठा गोंधळ निर्माण झाला होता. या मतमोजणीत आपची आठ मते अवैध ठरवण्यात आली होती. परंतु, ही मते आता वैध ठरवून चंदीगडच्या महापौर पदी आपचा उमेदवार घोषित करण्यात आला आहे. पीठासीन अधिकारी अनिल मसिह यांनी दिलेला निकाल सर्वोच्च न्यायालयाने रद्दबातल ठरवला आहे. चंदीगड महापौर निवडणुकीमध्ये मतामंध्ये फेरफार केलेल्या निवडणूक अधिकाऱ्याला सर्वोच्च न्यायालयाने फटकारलं आहे.

या प्रकरणात सर्व आठ मते ही न्यायालयाने वैध ठरवली असून त्यानंतर आता पुन्हा मतमोजणी घेण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले होते. त्यामुळे बाद करण्यात आलेल्या आठ मतपत्रिकांसह पुन्हा मतमोजणी घेण्यात आली आणि आप पक्षाचा उमेदवार विजयी घोषित करण्यात आला.

सरन्यायाधीश डीवाय चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने भाजप आणि आम आदमी पक्ष यांच्यातील आठ मतांचा अवैध ठरवल्याच्या वादावर सुनावणी घेतली. त्यानंतर चंदीगड महापौरपदाची निवडणूक ही पुन्हा घेण्याचे आदेश दिले होते. या प्रकरणात न्यायालयाचा अवमान झाल्याचंही निरीक्षण नोंदवलं आहे.

महापौरपदाच्या निवडणुकीत या मतांची पुनर्मोजणी झाल्यानंतर महापौरपदाच्या शर्यतीत आम आदमी पक्ष आणि काँग्रेस आघाडीचा उमेदवार विजयी घोषित करण्यात आला. ही सर्व मते कोणतेही ठोस कारण न देता फेटाळण्यात अवैध ठरवण्यात आली होती.

हे ही वाचा:

हिंदू नावाने राहणारे मुस्लिम बांगलादेशी दाम्पत्य अटकेत

मराठा आरक्षणाचे विधेयक एकमताने मंजूर

दातांवर शस्त्रक्रिया करताना युवक दगावला!

कोलकत्ता उच्च न्यायालयाने ममता सरकारला फटकारले

दरम्यान, चंदीगडचे महापौर मनोज सोनकर यांनी सर्वोच्च न्यायालयातील सुनावणी पूर्वीच राजीनामा दिला आहे. तर फेरफार करणारे निवडणूक अधिकारी अनिल मसिह यांनी मतपत्रिकांवर खाडाखोड केल्याचं मान्य केलं आहे. त्यामुळे त्यांच्यावर आता खटला चालणार आहे.

Exit mobile version