कोरोना रुग्णांचा आकडा महाराष्ट्रात पुन्हा एकदा वाढत आहे. त्याबरोबरच मुंबईतही कोरोनाचा कहर वाढत आहे. त्या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा नाईट कर्फ्यु लावावा लागेल असे सूचक विधान मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी केले आहे.
गेल्या चोविस तासात मुंबईत कोरोनचा तब्बल २ हजार ३७७ नवे रुग्ण आढळले होते. त्यामुळे मुंबईतील सक्रिय रुग्णांची संख्या ३ लाख ४९ हजार ९७४ झाली आहे. त्यामुळे मुंबई महानगरपालिकेकडून कोरोना नियंत्रणासाठी कठोर उपाययोजना केल्या जात आहेत. त्याचाच एक भाग म्हणजे मुंबईत नाईट कर्फ्यु लावावा लागेल असेल मोठे विधान महापौरांनी केले आहे.
हे ही वाचा:
ममतांच्या ‘खेला होबे’ला मोदींच्या ‘विकास होबे’ने उत्तर
ममतांना अजून एक धक्का, या खासदाराने दिला मोदींना पाठिंबा
वेस्ट इंडियन क्रिकेटपटूने मानले पंतप्रधान मोदींचे आभार.
कोरोनाचा कहर वाढत असतानाही बाजारात मोठ्या प्रमाणात गर्दी पहायला मिळत आहे. त्यामुळे अशा बाजारांचं स्थलांतर करण्याचा विचार देखील महानगरपालिकेकडून केला जात आहे. दादर येथील भाजी आणि फुल बाजारात मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे. त्यामुळे हे दोन्हा बाजार बीकेसीतील एमएमआरडीए मैदान आणि सायन येथील सोमय्या मैदानावर हलविण्यात येणार आहे.
राज्यातील काही शहरांत पुन्हा एकदा लॉकडाऊन करावा लागला आहे. काही ठिकाणी कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. त्यामुळे आता मुंबईतही नाईट कर्फ्यु लावावा लागेल असे संकेत महापौरांकडून देण्यात आले आहेत.