सचिन वाझे यांच्यासोबत आणखी काही अधिकाऱ्यांच्या अटकेची शक्यता?

सचिन वाझे यांच्यासोबत आणखी काही अधिकाऱ्यांच्या अटकेची शक्यता?

अंबानी यांच्या घरासमोर स्फोटकांनी भरलेल्या गाडीच्या प्रकरणात सचिन वाझे यांना अटक करण्यात आली होती. त्यांच्या चौकशीतून अजून काही अधिकाऱ्यांची नावे समोर येत असल्यामुळे या अधिकाऱ्यांच्या अटकेची शक्यता सुद्धा बळावली आहे.

यापूर्वी सचिन वाझे यांचे सहकारी असलेल्या रियाझ काझी यांची देखील एनआयएकडून चौकशी करण्यात येत होती. त्यातच आज न्यायालयाने वाझे यांना २५ मार्च पर्यंत एनआयए कोठडी सुनावली आहे. त्यामुळे या प्रकरणाची अजून कसून चौकशी केली जाणार आहे.

हे ही वाचा:

सचिन वाझे यांना पंचवीस मार्च पर्यंत एनआयए कोठडी

भाजपाकडून तमिळनाडूत खुशबू सुंदर यांना उमेदवारी

उर्दू भवनासाठी शिवसेनेचा पुढाकार

या चौकशीतून अजून काही नावे वर येत असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे या अधिकाऱ्यांना देखील अटक केली जाणार का? असा प्रश्न निर्माण झाला आहे.

शनिवारी रात्री उशीरा ११ वाजून ५० मिनिटांनी सचिन वाझे याला राष्ट्रीय सुरक्षा यंत्रणेकडून (एनआयए) अटक करण्यात आली. अंबानी यांच्या घराबाहेर सापडलेल्या स्फोटकांनी भरलेल्या गाडीच्या प्रकरणात वाझे यांना अटक करण्यात आली. शनिवारी सकाळी ११ वाजता वाझे हे राष्ट्रीय सुरक्षा यंत्रणेच्या पेडर रोड येथील कार्यालयात चौकशीसाठी हजर झाले होते. ही चौकशी तब्बल तेरा तास चालली. तेरा तासांच्या चौकशी नंतर वाझे याला एनआयए कडून अटक करण्यात आली. वादग्रस्त पोलीस अधिकारी सचिन वाझे यांना शनिवारी अटक केल्यानंतर रविवारी त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले. यावेळी न्यायालयाने वाझे यांना २५ मार्च पर्यंतची एनआयए कोठडी दिली आहे. न्यायमूर्ती शिंकरे यांच्या न्यायालयाने हा निकाल दिला आहे.

Exit mobile version