राज्यात लवकरच विधान परिषदेच्या निवडणूक पार पडणार आहेत. ११ जागांसाठी होणाऱ्या या निवडणुकांसाठी भाजपाकडून पाच नावांची घोषणा करण्यात आली आहे. यामध्ये पंकजा मुंडेंसह सदाभाऊ खोत यांच्या नावांची वर्णी लागली आहे. विधानपरिषदेच्या ११ जागांसाठी येत्या १२ जुलै रोजी मतदान होणार आहे. शिवाय त्याच दिवशी निकाल जाहीर होणार आहेत.
विधान परिषदेच्या ११ जागांसाठी १२ जुलै रोजी मतदान होणार आहे. तसेच त्यासाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख ही २ जुलै आहे. तत्पूर्वी आज भाजपाकडून आपल्या विधान परिषद उमेदवारांच्या नावांची घोषणा करण्यात आली आहेत. विधानपरिषदेच्या ११ जागा २७ जुलै रोजी रिक्त होत आहेत. या जागा विधानसभा सदस्यांमधून भरल्या जाणार असून सध्याचं संख्याबळ पाहता भाजपच्या पाच, एकनाथ शिंदेंच्या शिवसेनचे दोन, अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन आणि महाविकास आघाडीचे दोन उमेदवार विजयी होऊ शकतात.
पंकजा मुंडे यांच्यासह परिणय फुके, योगेश टिळेकर, अमित गोरखे आणि सदाभाऊ खोत यांना भाजपानं उमेदवारी दिलीआहे. विधान परिषदेचे हे आमदार विधान परिषद सदस्यांमार्फत निवडले जाणार आहेत. त्यामध्ये महायुतीचं संख्याबळ पाहता भाजपाचे ५ उमेदवार विजयी होऊ शकतात. त्यानुसार भाजपानं पाच जणांना आपल्याकडून संधी दिली आहे.
हे ही वाचा:
फेक नरेटिव्ह तयार करणाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करून पेपरफुटीचा कायदा आणणार
“दीदींचे पश्चिम बंगाल महिलांसाठी असुरक्षित”
धर्मवीर साहेबांच्या हिंदुत्वाची गोष्ट लवकरच येणार प्रेक्षकांच्या भेटीला
प. बंगालमध्ये विवाहबाह्य संबंधाच्या संशयावरून जोडप्याला मारहाण करणाऱ्या टीएमसी नेत्याला अटक
बीडमधून पराभवाचा धक्का बसल्यानंतर पंकजा मुंडे यांना राज्यसभेवर पाठवा अशी त्यांच्या समर्थकांकडून मागणी केली जात होती. भाजपकडून विधानपरिषद निवडणुकीसाठी दिल्लीत केंद्रीय नेतृत्त्वाकडे ११ नावांची यादी पाठवण्यात आली होती. आगामी विधानसभा निवडणूक आणि राजकीय समीकरणे लक्ष घेऊन भाजप पक्षश्रेष्ठींनी यापैकी पाच नावांवर शिक्कामोर्तब केले.