रेमडेसिवीरबाबत राज्याला केंद्राकडून दिलासा

रेमडेसिवीरबाबत राज्याला केंद्राकडून दिलासा

सध्या देशात कोरोनाचे तांडव चालू आहे. महाराष्ट्रासह अनेक राज्यांत रेमडेसिवीरचा प्रचंड तुटवडा जाणवत आहे. त्यात आता केंद्राने १९ राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांसाठी रेमडेसिवीर औषधाची अंतरिम वाटणी घोषित केली आहे. यात महाराष्ट्राला मोठा हिस्सा मिळणार आहे.

केंद्राने जाहिर केलेल्या वाटणीत सर्वात मोठा हिस्सा महाराष्ट्राला देण्यात येणार आहे. तब्बल २ लाख ६९ हजार २०० कुप्या महाराष्ट्रासाठी घोषित करण्यात आला आहे. त्यापाठोपाठ गुजरातसाठी १,५३,५०० उत्तर प्रदेशला १,२२,८००  मध्यप्रदेश ९२,४०० आणि दिल्लीसाठी ६१,९०० कुप्या निर्धारित केल्या गेल्या आहेत.

हे ही वाचा:

सरकार आपली जबाबदारी झटकत आहे- उच्च न्यायालयाचे ठाकरे सरकारवर ताशेरे

माकप नेते सीताराम येचुरींच्या मुलाचे कोरोनामुळे निधन

मोदींचे आज जागतिक पर्यावरणीय बदल परिषदेत संबोधन

बंगालमध्ये मतदानासाठी पंतप्रधान, गृहमंत्र्यांचे आवाहन

केंद्राकडून १९ राज्यांना हा पुरवठा करण्यात येणार आहे. त्यापैकी १४ राज्यांत वैद्यकिय ऑक्सिजनचा पुरवठा केला जातो तर ५ राज्यांत या औषधाला मोठ्या प्रमाणात मागणी आहे.

रेमडेसिवीर औषधाचा उपयोग कोविडमुळे अत्यवस्थ झालेल्या रुग्णांच्या उपचारासाठी केला जातो. ज्या रुग्णांना प्राणवायूचा पुरवठा करावा लागतो अशा रुग्णांसाठी या औषधाचा वापर केला जातो.

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत अनेक लोक बाधित होऊन अत्यवस्थ होत आहेत. त्यामुळे या औषधाचा वापर वाढला आहे. रेमडेसिवीरचा राज्यात प्रचंड तुटवडा निर्माण झाला आहे.

केंद्र सरकारने रेमडेसिवीरच्या निर्यातीवर बंदी घातली आहेच, त्याबरोबर रेमडेसिवीर उत्पादनासाठी लागणाऱ्या कच्च्या मालाच्या निर्यातीवर देखील बंदी घातली आहे. त्याशिवाय केंद्राने देशांतर्गत रेमडेसिवीरच्या किंमतीवर देखील कमाल मर्यादा घातली आहे. राज्य सरकारांना रेमडेसिवीरचा काळा बाजार रोखण्यासाठी कडक कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

Exit mobile version