मविआ हे सरकार आल्यापासून राज्यात घोटाळ्यांची मालिकाच सुरू झालेली आहे. माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यानंतर मंत्रिमंडळातील दुसरे अनिलही आता संकटात सापडले आहेत. केंद्रीय पर्यावरण, वन व हवामान बदल मंत्रालयाने (एमओईएफसीसी) महाराष्ट्र राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांच्या मालकीच्या रत्नागिरीतील रिसॉर्टच्या बांधकामात सीआरझेडच्या उल्लंघनाची आता सखोल चौकशी करण्यास सुरूवात केली आहे.
अनिल परब यांच्यावरील या आरोपांची गेले कित्येक दिवस माध्यमांमध्ये चर्चा होती. परब यांनी मात्र या गोष्टीचा वारंवार इन्कारच केला होता. अखेर परब यांच्याबाबत केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाने महाराष्ट्र कोस्टल झोन मॅनेजमेंट अथॉरिटी (एमसीझेडएमए) आणि नॅशनल सेंटर फॉर सस्टेनेबल कोस्टल मॅनेजमेन्टला (एनसीएससीएम) या उल्लंघनाचा अहवाल सादर करण्यास सांगितले आहे. परब यांनी मुरुड गावात सीआरझेड / ईएसझेड नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल चौकशीचे आदेश केंद्रीय पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी दिले. एमसीझेडएमएचे संचालक नरेंद्र टोके म्हणाले की, “आमच्या कार्यालयाने रत्नागिरी जिल्हाधिकारी यांना एमओईएफसीसीच्या निर्देशांच्या आधारे उल्लंघन केल्याचा अहवाल सादर करण्यास सांगितले आहे.
हे ही वाचा:
अजित पवारांचा गजनी झाला आहे का?
छे ! छे !! उद्धव ठाकरे अजिबात वाकले नाहीत…
ढकललं केंद्रावरचा दिल्लीत प्रयोग
‘तो’ ६५०० कोटींचा चेक विद्यार्थ्यांच्या फीसाठी वापरा!
भाजपाचे खासदार गोपाळ शेट्टी, गिरीश बापट आणि मनोज कोटक यांनी यासंदर्भात पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांच्याकडे तक्रार केली होती. परब यांच्याकडून सीआरझेड नियमांचे उल्लंघन झाल्याची ही तक्रार करण्यात आली होती.
राज्य वन विभागाने कोल्हापूर येथे मुख्य वन संरक्षक कोर्टाला चौकशी करण्यास सांगितले आहे, परंतु कोणतीही कार्यवाही झालेली नाही,” असे तक्रारदार प्रसाद कर्वे यांनी सांगितले. सीसीएफ कार्यालयाकडून कोणताही संपर्क स्थापित झाला नसल्याचेही दापोलीचे वन अधिकारी वैभव बोराटे यांनी सांगितले.