मोदी सरकारकडून दर महिन्याला १६ लाख नोकर भरती केली जात असल्याची माहिती केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिली आहे. राजस्थानच्या अजमेरमध्ये सीआरपीएफने रोजगार मेळावा आयोजित केला होता. त्यावेळी अश्विनी वैष्णव यांनी ही माहिती दिली आहे.
रोजगार मेळाव्यात अनेकांना नियुक्ती प्रमाणपत्रांचे वाटप करण्यात आले. त्यावेळी अश्विनी वैष्णव बोलत होते. ते म्हणाले, जगात आर्थिक संकटाची स्थिती आहे. अशा स्थितीतही भारत हा एक उर्जेचा स्रोत म्हणून उदयास आला आहे. मोदी सरकारच्या अनेक योजनांमुळे प्रत्येक वर्गाचे जीवन सुखकर झालं आहे. केंद्र सरकारकडून दर महिन्याला १६ लाख लोकांना पारदर्शक पद्धतीने नोकऱ्या दिल्या जात आहेत. तसेच जागतिक आर्थिक संकट ओढावले असतानाही भारत ही संधी असलेल्या परिपूर्ण उर्जेचा स्रोत म्हणूनही उदयास आला आहे.
राष्ट्र प्रथम हा मंत्र देशातील तरुणांनी अंगिकारला पाहिजे. आयुष्यात त्यांनाच विजय मिळतो ज्यांनी नेहमीच कर्तव्य करताना राष्ट्राला प्रथम स्थान दिले आहे, असंही अश्विनी वैष्णव म्हणाले आहेत.
हे ही वाचा :
आपले तुकडे करण्यात येतील, असे पत्र दोन वर्षांपूर्वीच श्रद्धाने पोलिसांना दिले होते!
लोकांची सेवा करतोय तोपर्यंत सरकार टिकेल
दिशा सालियनचा मृत्यू कसा झाला? सीबीआय तपासात झाले उघड
‘ज्यांनी बाळासाहेबांना विरोध केला, त्यांना आदित्य भेटणार’
दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ऑक्टोबर महिन्यात रोजगार मेळावा सुरू केला होता. तेव्हा पहिल्या टप्प्यात ७५ हजार युवकांना नियुक्ती पत्रे देण्यात आली. देशभरातील ४५ विविध ठिकाणी आयोजित कार्यक्रमात तरुणांना नियुक्तीपत्रे देण्यात आली होती. यामध्ये हिमाचल प्रदेश आणि गुजरात येथे निवडणुकीची आचारसंहिता असल्याने यांना वगळण्यात आले होते.