बंडखोर आमदारांच्या घराबाहेर सीआरपीएफचे कडे

बंडखोर आमदारांच्या घराबाहेर सीआरपीएफचे कडे

शिवसेनेच्या एकनाथ शिंदे आणि काही आमदारांनी बंड पुकारल्यानंतर त्यांच्या विरोधात मुंबईसह राज्यात काही ठिकाणी शिवसैनिक रस्त्यावर उतरले आहेत. तसेच सुरक्षेच्या दृष्टीने या आमदारांना थेट केंद्राकडून सुरक्षा पुरवण्यात आली आहे. शिंदे गटातील पंधरा आमदारांच्या घरी केंद्र सरकारकडून सुरक्षा पुरविण्यात येणार आहे.

आमदार सदा सरवणकर यांच्या घराबाहेर सीआरपीएफचे जवान तैनात करण्यात आले आहेत. तसेच त्यांच्या पूर्ण घराला बॅरिकेट्स लावण्यात आले आहे. शिंदे गटातील १५ आमदारांनी सुरक्षेच्या कारणास्तव केंद्रीय गृह सचिव आणि राज्यपाल यांना पत्र लिहिलं होतं त्यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे.

या आमदारांविरोधात निषेध नोंदवण्यासाठी शिवसैनिक काल रस्त्यावर उतरले होते. यावेळी काही आमदारांच्या कार्यालयाची तोडफोड करण्यात आली तर काही ठिकाणी या आमदारांच्या पोस्टरला काळे फासण्यात आले. त्यानंतर सुरक्षेच्या दृष्टीने केंद्र सरकारची शिंदे गटातील आमदारांना सुरक्षा पुरवण्यात आली आहे.

हे ही वाचा:

… म्हणून मुख्यमंत्री योगींच्या हेलिकॉप्टरचं इमर्जन्सी लँडिंग

शिवसेनेचे ठाणे जिल्हाप्रमुख नरेश म्हस्के देणार राजीनामा

भगतसिंह कोश्यारींना डिस्चार्ज मिळणार; राजकीय घडामोडींना वेग येण्याची शक्यता

बंडखोर आमदारांना निवडणूक लढवून दाखवण्याचं राऊतांकडून आव्हान

आज संध्याकाळपर्यंत १५ आमदार यांच्या घरी सीआरपीएफचे जवान तैनात होणार असल्याची माहिती समोर आली आहे. सध्या आमदार सदा सरवणकर यांच्या घराबाहेर सीआरपीएफचे जवान तैनात करण्यात आले आहेत. उर्वरित १४ आमदारांची नावे अजून समोर आलेली नाहीत.

Exit mobile version