पालिका आयुक्त चहल म्हणतायत महाराष्ट्रावर अन्याय नाही…

पालिका आयुक्त चहल म्हणतायत महाराष्ट्रावर अन्याय नाही…

हा विषय फक्त सोशल मीडियावर आहे, एकांगी बातम्यांत आहे आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या तोंडी आहे. केंद्र सरकार सर्व राज्यांना सर्व प्रकारची मदत कोणताही भेदभाव न करता देत आहे. हे म्हणत आहेत, मुंबई महानगरपालिकेचे मुख्य आयुक्त चहल.

हे ही वाचा :

सोनियांचे चरणचाटण उपयोगी पडलेले दिसत नाही- अतुल भातखळकर

ऑलिंपियन कुस्तीगीर सुशील कुमारचा शोध घेण्यासाठी ‘लूकआऊट’ नोटीस

निर्मला सीतारामन यांचे ममता बॅनर्जींना प्रत्युत्तर

मुंबई – कानपूर दरम्यान सुपरफास्ट विशेष ट्रेन्स

१६-१७ एप्रिलच्या रात्री मुंबईतील ६ हॉस्पिटलमध्ये ऑक्सिजन तुटवडा भासू लागला. बीकेसीमध्ये बेड उपलब्ध होते, म्हणून वेळ निभावून नेली. पण भविष्यात असे होऊ शकते, याचा अंदाज आला म्हणून चहल यांनी १७ एप्रिलला सकाळी ७ वाजता केंद्रीय कॅबिनेट सचिव, गृह सचिव आणि आरोग्य सचिवांसकट काहींना SOS पाठवले. त्याच वेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि इतर ७ मोठ्या नेत्यांनाही मेसेजेस पाठवले..

जेमतेम २० सेकंद झाले असतील. केंद्रीय कॅबिनेट सचिव गौबा यांचा फोन आला. त्यांनी मुंबईची ऑक्सिजन समस्या समजावून घेतली. रिलायन्सच्या जामनगर फॅक्टरीमधून मुंबईला ऑक्सिजन मिळवून द्या, अशी मागणी चहल यांनी केली.

त्याच दिवशी संध्याकाळी १२५ मेट्रिक टन ऑक्सिजन घेऊन ट्रक्स मुंबईच्या दिशेने निघालेसुध्दा. चहल म्हणतात,

Now the problem (of oxygen) has virtually become history in Mumbai because of great help from the Government of India.

केंद्र सरकारचे ऑक्सिजन पुरवठा आणि वितरणाचे धोरण कारणीभूत आहे का असे विचारल्यावर ते म्हणाले,

The Government of India should not be blamed at all. If anybody has to be blamed, it is states.

केंद्र राज्य संबंध ताणले गेले आहेत असे जे सांगितले जाते त्यात तथ्य नाही असे ते म्हणाले. केंद्रातील अधिकारी आमचे बॅचमेट्स आहेत.

Nobody found the Government of India not willing to help us. Even they have their own issues… As we are learning, even they were learning.

जे भाजपचे विशेषतः मोदींचे राजकीय विरोधक आहेत त्यांच्या कडून काही अपेक्षा नाही. पण काही तटस्थ दांभिक हल्ली केंद्र सरकारला निकम्मे ठरवून सामान्य लोकांची दिशाभूल करत आहेत. अशा लोकांपासून जपून रहा. केंद्र सरकार बद्दल लगेच वाईट मत बनवून घेऊ नका.

मोदी सरकारने सर्व राज्यांना कोणत्याही प्रकारचा भेदभाव न करता पूर्णपणे सहकार्य केले आहे .

 

Exit mobile version