25 C
Mumbai
Monday, December 23, 2024
घरराजकारणहवाई मार्गाने ऑक्सिजन टँकर्सची वाहतूक करण्यास केंद्राची परवानगी

हवाई मार्गाने ऑक्सिजन टँकर्सची वाहतूक करण्यास केंद्राची परवानगी

Google News Follow

Related

करोनासारख्या महामारीवर आपण एकजुटीनेच मात करू शकतो, असा कानमंत्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्याचे महाराष्ट्राचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी पत्रकारांना सांगितले. राजेश टोपे यांनी शुक्रवारी पंतप्रधानांशी संवाद साधला. या संवादाची माहिती त्यांनी पत्रकारांना दिली.

ऑक्सिजनची सध्या महाराष्ट्रात कमतरता असल्याने एअर फोर्सच्या विमानांनी रिकामे टँकर घेऊन जाण्याची महाराष्ट्राला परवानगी केंद्रानी दिली आहे. त्यामुळे किमान रिकाम्या टँकर्सचे वहन वेगाने होऊ शकेल. त्याबरोबरच जवळचे राज्य असेल तर भरलेले टँकर रस्त्याने आणले जातील किंवा रेल्वेने आणले जातील. इतर राज्यांनी पण याला पाठिंबा दिला असल्याचे त्यांनी सांगितले.

हे ही वाचा:

देशवासीयांचे ‘प्राण’ वाचवायला भारतीय हवाईदल झेपावले

फ्रान्स भारताच्या पाठिशी सहाय्य करण्यासाठी ठामपणे उभा आहे

‘राजेश टोपे यांचे वक्तव्य असंवेदनशील’

मनसुख हिरेन हत्या प्रकरणात सुनिल माने यांना बेड्या

ऑक्सिनजन निर्मीतीचे नवे प्रकल्प चालू करता येतील का याविषयात विचार करण्याची सूचना पंतप्रधानांनी सर्व राज्यसरकारांना केली. नायट्रोजन निर्मिती प्रकल्पातून निर्माणा होणारा ऑक्सिजन मिळवता येईल का त्याचप्रमाणे इथेनॉल निर्मिती कारखान्यात असलेल्या मशिनरीत थोडी नवी मशिनरी देऊन ऑक्सिजन निर्मितीचा प्रयत्न होऊ शकतो का असा विचार चालू आहे. त्या ऑक्सिजनच्या पुरवठ्यासाठी साखर कारखान्यातूनही सिलेंडर देऊन ते ऑक्सिजनसाठी वापरता येतील असा प्रयत्नही चालू असल्याचे ते म्हणाले.

ऑक्सिजनचे ऑडिट करून, नवे आधुनिक तंत्रज्ञान वापरून ऑक्सिजनचा जास्तीत जास्त उपयोग करण्याबाबत पंतप्रधानांनी मार्गदर्शन केले असल्याचे त्यांनी सांगितले.

रेमडेसिवीर बाबत न्याय हक्काचे रेमडेसिवीर मिळावा ही मागणी केली असून, ती पंतप्रधानांनी गांभीर्याने ऐकली आहे. त्यामुळे याबाबत योग्य निर्णय होईल असं वाटतं असेही ते म्हणाले

१८ ते ४५ दरम्यान आक्रमक तऱ्हेने लसीकरण करण्याचा निर्णय घेतला आहे. १८ ते ४५ दरम्यान ५ कोटी लोकसंख्या असू शकते, तेव्हा सुमारे १० कोटी डोसेसचे आर्थिक नियोजन करायला लागेल असे त्यांनी लसीकरणाबाबत सांगितले. त्याबोबरच पुन्हा एकदा लस उपलब्ध नसल्याची जुनीच रड देखील त्यांनी पुन्हा एकदा गायली.

एकजूटीनेच या महामारीवर जिंकू शकतो असा मंत्र पंतप्रधानांनी बैठकीच्या सुरूवातीलाच दिल्याचे देखील त्यांनी सांगितले.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
216,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा