केंद्रीय निवडणूक आयोगाने देशातील राजकीय पक्षांवर मोठी कारवाई केली आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्या पक्षांवर निवडणूक आयोगाकडून कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईत २५३ पक्षांना निष्क्रिय जाहीर करण्यात आले आहे. तर अस्तित्वात नसलेल्या ८६ पक्षांना बिगरमान्यताप्राप्त नोंदणीकृत राजकीय पक्षांच्या यादीतून काढण्यात आले आहे.
केंद्रीय निवडणूक आयोगाने मोठी कारवाई करत नियमांचे पालन न करणाऱ्या ३३९ बिगरमान्यताप्राप्त नोंदणीकृत राजकीय पक्षांविरोधात कारवाई केली आहे. यात २५३ पक्षांना निष्क्रिय जाहीर केले आहे. तर अस्तित्वात नसलेल्या ८६ पक्षांना बिगरमान्यताप्राप्त नोंदणीकृत राजकीय पक्षांच्या यादीतून काढून टाकण्यात आले आहे.
यामध्ये महाराष्ट्रातील अकरा पक्षांचा समावेश आहे. तर तेलंगणा, कर्नाटक, बिहार, उत्तर प्रदेश, तामिळनाडू आणि दिल्लीतील काही पक्षांचा समावेश आहे. निवडणूक चिन्ह मिळाल्यानंतर बराच काळ निष्क्रिय राहिलेल्या पक्षांबद्दल केंद्रीय निवडणूक आयोगाने स्थानिक निवडणूक अधिकाऱ्यांकडून अहवाल मागविला होता. त्याआधारे आयोगाने २५३ पक्षांना निष्क्रिय जाहीर केले आहे.
हे ही वाचा:
अयोध्येतील राम मंदिरावर १८०० कोटी खर्च होणार
इलेक्ट्रिक स्कूटर रिचार्जिंग युनिटला लागलेल्या आगीत १० जणांचा मृत्यू
मुख्यमंत्री शिंदेंकडून ‘राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता सेवा पंधरवडा’ जाहीर
पाकिस्तान विरुद्धच्या विजयाचा आनंद श्रीलंकेपेक्षा अफगाणिस्तानला जास्त
राज्यपातळीवरील पक्षाचा दर्जा प्राप्त करण्यासाठी विधानसभा किंवा लोकसभेच्या निवडणुकीत विशिष्ट प्रमाणात मते मिळवून शकणारे पक्ष तसेच नोंदणी केल्यानंतरही कधीही निवडणूक न लढलेल्या पक्षांना बिगरमान्यताप्राप्त नोंदणीकृत पक्ष म्हटले जाते.
कारवाई झालेले महाराष्ट्रातील पक्ष-
राष्ट्रीय अमन सेना (मुंबई), द ह्युमॅनिस्ट पार्टी ऑफ इंडिया (मुंबई), भारतीय रिपब्लिकन पक्ष (कांबळे गट) (नवी मुंबई), राष्ट्रीय लोकशाही पार्टी (रायगड) आणि शिवाजी काँग्रेस पार्टी (नाशिक)
यादीतून वगळण्यात आलेले पक्ष-
राष्ट्रीय सर्वसमाज पार्टी-भारत (मुंबई), रिपब्लिकन प्रेसिडियम पार्टी (पुणे), सत्यवादी पक्ष (औरंगाबाद), किसान गरीब नागरिक पार्टी (मुंबई), उत्तराखंड सेना पार्टी (ठाणे) आणि क्रांतीसेना महाराष्ट्र (मुंबई),