सर्वात वाईट परिस्थितीसाठी तयार राहण्याचा केंद्राकडून ठाकरे सरकारला सल्ला

सर्वात वाईट परिस्थितीसाठी तयार राहण्याचा केंद्राकडून ठाकरे सरकारला सल्ला

महाराष्ट्रात सातत्याने कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच जात आहे. गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात पंधरा हजारपेक्षा अधिक रुग्णांची एका दिवसात नोंद होत आहे. त्यामुळे केंद्र सरकारने एक पत्र पाठवून ठाकरे सरकारला सर्वात वाईट परिस्थितीसाठी तयार राहण्यास सांगितले आहे.

केंद्रिय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी राज्य आरोग्य सचिवांना एका पत्र पाठवले आहे. या पत्रात राज्यात रुग्णांचा पाठपुरावा आणि त्यांच्या संपर्कात आलेल्यांचे ट्रेसिंग करण्यातील त्रुटींबाबत चिंता व्यक्त केली होती आणि याकडे ठाकरे सरकारने अधिक लक्ष देण्याची गरज असल्याचे देखील सांगितले. एका केंद्रीय समितीने राज्याला भेट दिल्यानंतर ॲंटिजेन टेस्टवरील अधिक निर्भरतेबाबत केंद्र सरकारला कळवले होते.

हे ही वाचा:

पंतप्रधान साधणार सर्व मुख्यमंत्र्यांशी संवाद

बलात्कार पीडितांची आई ‘या’ मुख्यमंत्र्याविरुद्ध निवडणुकीच्या रिंगणात

भाजपाच्या ‘या’ खासदाराची आत्महत्या?

भूषण यांनी सांगितले की, कोविड-१९च्या रुग्णांच्या चाचण्या, तपास, पाठपुरावा आणि विलगीकरणाबाबत त्रुटी आहेत. कोविड-१९च्या बाबत ग्रामीण आणि शहरी भागात लोकांनी अधिकाधीक काळजी घेण्यावाचून पर्याय उपलब्ध नाही.

केंद्राने महाराष्ट्रात दुसरी लाट आली असल्याबाबत काळजी व्यक्त केली आहे. त्याबरोबरच वीकेंड लॉकडाऊन, नाईट कर्फ्यु यांचा मर्यादित फायदा होत असल्याचे देखील त्यांनी सांगितले आहे. त्याबरोबरच नाशिक आणि औरंगाबाद मधील अधिक मृत्युदराबाबत जिनोम टेस्टींग द्वारे यामागचे कारण शोधण्याबद्दल सांगितले आहे.

केंद्रीय समितीने दिलेल्या अहवालावर या पत्राची भिस्त आहे. मुंबईतील मृत्युदर ५ टक्के आहे, तर औरंगबाद येथील मृत्युदर ३० टक्के आहे.

Exit mobile version