भारताच्या खेड्यातील प्रत्येक घरात नळाचे पाणी पोहोचवण्याच्या हेतूने सुरू करण्यात आलेल्या जल जीवन मिशन योजनेसाठी उत्तर प्रदेश राज्यासाठी मोठी आर्थिक घोषणा करण्यात आले आहे. केंद्रीय जल शक्ती मंत्रालयाने सुमारे दोन हजार कोटी दिले आहेत.
भारताच्या खेडोपाडी नळाचे पाणी पोहोचावे यासाठी जल जीवन मिशन योजना आखण्यात आली. केंद्रीय जलशक्ती मंत्रालयाने यावर्षीच्या सुमारे १० हजार कोटी रुपयांपैकी २,४०० कोटी रुपयांचा निधी देऊ केला आहे.
भारताच्या प्रत्येक गावातील प्रत्येक घरात नळाने पिण्याचे पाणी पोहोचवून गावातील स्त्रिया आणि बालिकांना पाणी आणण्याच्या कष्टदायक कामातून मुक्तता देण्याच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ध्येयाची पुर्तता या योजनेच्या माध्यमातून केली जात आहे. २०१९-२० मध्ये केंद्र सरकारकडून उत्तर प्रदेशसाठी १,२०६ कोटी रुपयांचा निधी यासाठी देण्यात आला होता. त्यानंतर ही रक्कम वाढवून २०२०-२१ मध्ये २,५७१ कोटी रुपये करण्यात आली होती.
हे ही वाचा:
‘संसदेचं अधिवेशन चालू द्या’ म्हणत ‘या’ खासदाराचं आंदोलन
तुम्ही रडू नका, देश तुमच्या पाठीशी आहे!
कल्याणमध्ये सिग्नलचीच बत्ती गुल!!
काय ठरलं राज ठाकरे चंद्रकांत पाटील यांच्या बैठकीत?
केंद्रीय जलशक्ती मंत्री गजेंद्रसिंह शेखावत यांनी हा निधी देताना राज्याला २०२४ पर्यंत प्रत्येक ग्रामीण घराला नळाने पाणी देण्यासाठी संपूर्ण सहकार्य करण्याचे आश्वासन देखील दिले आहे.
उत्तर प्रदेशात २.६३ कोटी घरे ग्रामीण भागात असून सध्याच्या घडीला सुमारे ३२ लाख घरांमध्ये नळाद्वारे पिण्याच्या पाण्याचा पुरवठा केला जात आहे. जल जीवन मिशनची सुरूवात होण्यापूर्वी ही संख्या केवळ ५.१६ लाख एवढीच होती. उत्तर प्रदेशात कोविड-१९च्या महामारीच्या काळात देखील सुमारे २६ लाख घरांना नळ जोडणी देण्यात आली. चालू आर्थिक वर्षात ५ जिल्ह्यात ‘हर घर जल’ असे ध्येय ठरविण्यात आले आहे.