केंद्राने पुरवल्या १७ कोटी मोफत लसी

केंद्राने पुरवल्या १७ कोटी मोफत लसी

देशात कोविडचा सामना करण्यासाठी लसीकरण मोहिम मोठ्या जोमाने राबवली जात आहे. केंद्र सरकारकडून लसीकरण मोहिमेसाठी सातत्याने लस पुरवली जात आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने लसींच्या पुरवठ्याच्या संदर्भात महत्त्वाची माहिती दिली आहे. केंद्रशासित प्रदेश आणि राज्ये यांना कोट्यवधी लसी मोफत देण्यात आल्या आहेत. त्याशिवाय लाखो लसी अजून पुढील काही दिवसात मिळणार आहेत.

लसीकरण मोहिमेला प्रारंभ झाल्यापासून केंद्र सरकारने सातत्याने राज्यांना लसींचा पुरवठा केला आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार आत्तापर्यंत केंद्रशासित प्रदेश आणि राज्य सरकारे यांना एकत्रित मिळून १७.३५ कोटी लसी देण्यात आल्या आहेत. या सर्व लसी मोफत देण्यात आल्या आहेत. मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार विविध राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांत मिळून सुमारे ९० लाख डोसेस अजून शिल्लक आहेत. हे डोस अजून दिले जाणे बाकी आहे. त्यानंतर केंद्रीय मंत्रालयाकडून भविष्यात पुरवल्या जाणाऱ्या डोसेस बद्दल देखील माहिती देण्यात आली आहे. येत्या तीन दिवसात राज्यांना अजून १० लाख डोस पाठवण्यात येणार आहेत.

हे ही वाचा:

रेमडेसिवीरचा काळाबाजार थांबणार

भारताकडे मदतीचा ओघ सुरूच

संगमनेरमध्ये जमावाकडून पोलिसांवर हल्ला

शिवसेनेचा ‘हा’ बडा नेता भाजपाच्या वाटेवर

भारताच्या कोविड लसीकरणाला १६ जानेवारीपासून सुरूवात झाली आहे. आत्तापर्यंत भारताने सुमारे १३ कोटींपेक्षा अधिक लोकांचे लसीकरण केले आहे. कित्येकांचे लसींचे दोन्ही डोस घेऊन झाल आहेत. भारतातील लसीकरणाचा वेग वाढवण्यासाठी भारत सरकारने परदेशी लसींना देखील मान्यता दिली आहे. आत्तापर्यंत भारताच्या लसीकरणाची मदार कोविशिल्ड आणि कोवॅक्सिन या दोनच लसींवर होती. नुकतीच भारतात स्पुतनिक ही लस देखील दाखल झाली आहे. त्यापाठोपाठ इतर चार लसी देखील लवकरात लवकर भारतात दाखल होणे अपेक्षित आहे.

Exit mobile version