भंडारा रुग्णालयाच्या पुनर्बांधणीसाठी केंद्राकडून भरघोस मदत

भंडारा रुग्णालयाच्या पुनर्बांधणीसाठी केंद्राकडून भरघोस मदत

दिनांक ९ जानेवारी २०२१ रोजी भंडारा येथील रुग्णालयाला लागलेल्या आगीत १० नवजात बालकांचा मृत्यु झाला होता. त्यावरून राज्य सरकारवर सडकून टीका देखील करण्यात आली होती. आता केंद्र सरकारकडून लहान मुलांच्या अतिदक्षता विभागाच्या पुनर्बांधणीसाठी १ कोटी ५३ लाख रुपयांचा निधी देण्यात आला आहे.

९ जानेवारीच्या दुर्घटनेत दहा बालकांना आपले प्राण गमवावे लागले होते. त्यानंतर केंद्रासोबतच जिल्हा रुग्णालयाकडून या संपूर्ण रुग्णालयात नवी अग्निशमन प्रणाली बसविण्यासाठी १ कोटी ९० लाख रुपयांचा प्रस्ताव पाठवण्यात आला आहे. या रुग्णालयाची क्षमता ४८२ खाटांची आहे. या प्रस्तावावर राज्य सरकारची संमती अजून प्राप्त होणे बाकी आहे.

सध्या रुग्णालयात तात्पुरत्या स्वरुपाचा लहान मुलांचा अतिदक्षता विभाग उघडण्यात आला आहे. गेल्या महिन्यातील दुर्घटनेनंतर राज्य सरकारने तातडिने कारवाई करत जिल्ह्यातील सात अधिकाऱ्यांना निलंबीत केले. यात एका सरकारी सर्जनचा समावेश आहे. सरकारने या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी एका समितीची स्थापन केली. या समितीने दिलेल्या अहवालानुसार या रुग्णालयातील डॉक्टर आणि नर्सेस यांनी त्यांच्या अग्निशमन यंत्रणा बसविण्याच्या आणि त्या यंत्रणेची निगराणी राखण्याच्या कामात कुचराई केली, असा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला होता.

Exit mobile version