सातवा आंतरराष्ट्रीय योग दिवस उत्साहात साजरा

सातवा आंतरराष्ट्रीय योग दिवस उत्साहात साजरा

आज संपूर्ण जगामध्ये सातवा आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा केला जात आहे. त्यानिमित्त अनेक नेत्यांनी ट्वीटरवरून योग दिवसाच्या शुभेच्छा तर दिल्या आहेतच परंतु, कोविड काळात सकारात्मकता आणि आत्मबल वाढवण्यासाठी उपयुक्त ठरलेल्या योग बद्दल पंतप्रधान नरेंद्र  मोदी यांनी आपले विचार देखील देशवासियांसमोर मांडले आहेत.

भारताने संयुक्त राष्ट्रसंघात आंतरराष्ट्रीय योग दिवसाची कल्पना मांडली होती. ती जगातील अनेक देशांनी उचलून घेतल्यानंतर संपूर्ण जगात योग दिवस साजरा केला जाऊ लागला. आज सातवा योग दिवस संपूर्ण जगात साजरा केला जात आहे.

हे ही वाचा:

कोरोना रुग्णसंख्येचा ८८ दिवसांचा नीचांक

लोकसंख्या नियंत्रण कायदा आणायची योगी सरकारची तयारी

हॅाटेल चालकांना परवाना शुल्कात हवी सूट

आता विधि अभ्यासक्रम पदवीचा गोंधळ

आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनतेशी संवाद साधला होता. त्यावेळी त्यांनी कोरोनासारख्या आपत्ती काळात योगने अनेकांना कशी प्रेरणा दिली हे देखील सांगितले. ते म्हणाले की, या काळात लोक योग विसरू शकले असते, परंतु त्याऐवजी लोक मोठ्या प्रमाणात योगकडे वळले आहेत. आघाडीच्या अनेक कर्मचाऱ्यांनी या काळात योग अवलंबला, त्याशिवाय अनेक रोग्यांवर देखील योग अवलंबला गेला होता. त्यानंतर अनेक बरे झालेले रुग्ण देखील त्यांचे योगबद्दलचे अनुभव सांगतात असे देखील त्यांनी सांगितले.

अमेरिकेत योग दिन साजरा

आज योग दिन अनेक ठिकाणी साजरा केला जात आहे. भारतातील अनेक नेत्यांनी स्वतःचे योग करतानाचे फोटो ट्वीट केले होते. त्या बरोबरच अमेरिकेतील भारतीय दूतावासातील अधिकाऱ्यांनी देखील योग दिन साजरा केल्याचे फोटो देखील प्रसिद्ध झाले आहेत. अमेरिकेतील वॉशिंग्टन डी सी येथील भारतीय दूतावासातील अधिकाऱ्यांनी योग केला होता. त्याचे फोटो एएनआय वृत्तसंस्थेच्या ट्वीटरवरून प्रसारित झाले होते.

Exit mobile version