भाजपा कार्यकर्त्याच्या हत्येप्रकरणी प. बंगालमध्ये ११ जणे अटकेत

भाजपा कार्यकर्त्याच्या हत्येप्रकरणी प. बंगालमध्ये ११ जणे अटकेत

सीबीआयची धडक कारवाई

पश्चिम बंगालमधील विधानसभा निवडणुकीनंतर झालेल्या हिंसाचार प्रकरणी सीबीआयने मोठी कारवाई केली आहे. नंदीग्राममध्ये भाजप कार्यकर्त्याच्या हत्येप्रकरणी सीबीआयने ११ जणांना अटक केली आहे. शनिवारी एजन्सीने पूर्व मिदनापूरमधील नंदीग्राम येथून अटक केली. २ मे रोजी झालेल्या विधानसभा निवडणुकांचे निकाल लागल्यानंतर हिंसाचार घडून भाजप कार्यकर्ता देवब्रत मैती यांची हत्या झाली होती. सीबीआयच्या या कारवाईला आता राजकारणाचा रंग चढू लागला आहे. टीएमसीने या कारवाईला भाजपकडून बदला घेण्याचे षड्यंत्र असल्याचे म्हटले आहे.

टीएमसीने या कारवाईला शुभेंद्रू अधिकारी यांच्या वक्तव्याशी जोडले आहे, ज्यांनी नंदीग्राममधून ममता बॅनर्जींना पराभूत केले होते. शुभेंद्रू अधिकारी यांनी त्यांच्या कथित निवेदनात म्हटले होते की, ज्यांची नावे राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाच्या तपासात पुढे आली आहेत त्यांना अटक केली जाईल.

हे ही वाचा:

आरे वसाहतीत आता बिबट्यांपायी दुचाकीवरून फिरणेही मुश्कील

नवाब मलिकविरोधात १०० कोटींचा दावा करणार मोहित कंबोज

आरीफ मोहम्मद खान म्हणतात, अल्पसंख्य ही संकल्पनाच मान्य नाही, मी भारतीय आहे!

लखीमपूर प्रकरणी उद्या ‘सरकारी महाराष्ट्र बंद’

टीएमसीने केलेले आरोप फेटाळून लावत भाजपने म्हटले आहे की, या कारवाईचा केंद्र सरकारशी काहीही संबंध नाही. सीबीआयचा तपास उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार केला जात असून त्याअंतर्गत ही कारवाई करण्यात आल्याचे पक्षाने म्हटले आहे. त्याचा सरकारशी काहीही संबंध नाही. भाजप कार्यकर्त्याच्या हत्येप्रकरणी सीबीआयने अटक केलेल्या नेत्यांमध्येमध्ये टीएमसी नेते शेख सुफियान यांचे जावई शेख हकीबुल यांचा समावेश आहे.

Exit mobile version