अनिल देशमुखांना सीबीआयने घेतलं ताब्यात

अनिल देशमुखांना सीबीआयने घेतलं ताब्यात

माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचा ताबा आता केंद्रीय अन्वेषण विभाग म्हणजेच सीबीआयकडे देण्यात आला आहे. याआधी ते अंमलबजावणी संचालनालयाच्या (ईडी) ताब्यात होते. आर्थर रोड तुरुंगातून आता सीबीआयने त्यांचा ताबा घेतला आहे.

गेल्या आठवड्यात मुंबई सत्र न्यायालयातील विशेष सीबीआय न्यायालयाने १०० कोटींच्या वसूली प्रकरणी सचिन वाझे, कुंदन शिंदे, संजीव पालांडे आणि अनिल देशमुख या चौघांचा ताबा घेण्याची परवानगी तपास यंत्रणेला दिली होती. न्यायालयाच्या परवानगीनंतर सीबीआयने सचिन वाझे, संजीव पालांडे आणि कुंदन शिंदे यांना सोमवार, ४ एप्रिल रोजी अटक करण्यात आली. अटकेनंतर या तिघांनाही मुंबई सत्र न्यायालयातील विशेष सीबीआय कोर्टापुढे हजर केलं असता कोर्टाने या तिघांना सात दिवसांची सीबीआय कोठडी मंजूर केली.

मात्र, या प्रकरणातील आरोपी अनिल देशमुख यांना प्रकृतीच्या कारणामुळे जे जे रुग्णालयात दाखल करण्यात आल्याने सीबीआय त्यांचा ताबा घेऊ शकली नाही. मात्र, मंगळवार ५ एप्रिल रोजी अनिल देशमुख यांना डिस्चार्ज मिळाल्यानंतर सीबीआयने त्यांचा ताबा घेण्याआधीच देशमुखांनी त्याविरोधात उच्च न्यायालयात धाव घेतली होती. परंतु, या याचिकेवरील सुनावणीआधीच सीबीआयने आर्थर रोड तुरुंगातून अनिल देशमुख यांना ताब्यात घेतले.

हे ही वाचा:

हिमाचलचे विद्यार्थीही म्हणणार ‘यदा यदा ही धर्मस्य’

‘काही लोकांचा नखं कापून शहीद होण्याचा प्रयत्न’

माननीय बाळासाहेब, जमल्यास उद्धवजींना हिंदूंबाबत सुबुद्धी द्या

‘संजय राऊत, मुख्यमंत्री ठाकरेंना पुरावे द्या; टाईमपास करून वेळ घालवू नका’

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून अनिल देशमुख यांच्यावर आरोप केले होते. त्यानंतर ईडीने मनी लाँड्रिंग आरोपांतर्गत चौकशी सुरु केली. अखेर अनिल देशमुखांविरोधात गुन्हा नोंदवून ईडीने देशमुखांना अटक केली. तेव्हापासून देशमुख आर्थर रोड कारागृहात होते.

Exit mobile version