अनिल देशमुखांना सीबीआयकडून समन्स

अनिल देशमुखांना सीबीआयकडून समन्स

राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना सीबीआयनं समन्स पाठवलं आहे. सीबीआयकडून अनिल देशमुख यांची १४ एप्रिलला चौकशी करण्यात येणार आहे. मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी केलेल्या आरोपांवर १४ एप्रिलला चौकशी करण्यात येणार आहे. अनिल देशमुख यांच्या स्वीय सहायकांची रविवारी चौकशी करण्यात आली होती.

सीबीआय अधिकारी काल (११ एप्रिल) सचिन वाझे यांच्या दोन चालकांना डीआरडीओ मध्ये घेऊन आले होते. तर अनिल देशमुख यांचे खासगी सचिव एस कुंदन आणि संजीव पालांडे यांना बोलावण्यात आलं होतं. या सगळ्यांची आठ ते दहा तास चौकशी करण्यात आली. याआधी अँटिलिया स्फोटक प्रकरणी एनआयएच्या ताब्यात असलेले सचिन वाझे,  महेश शेट्टी बार मालकासह मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह, तक्रारदार वकील जयश्री पाटील यांचा जबाब नोंदवण्यात आला आहे.

हे ही वाचा:

रेमडेसिवीर!! भाजपाने ‘आणून दाखवले’!!

लोकांना घरात बंद करून काहीही साध्य होणार नाही- भाजपा

शरद पवारांवरील शस्त्रक्रिया यशस्वी

दहावी- बारावीच्या परिक्षांबाबत ठाकरे सरकारचा मोठा निर्णय

 

काही दिवसांपूर्वी मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सचिन वाझेंना दर महिन्याला शंभर कोटी रुपयांचे टार्गेट दिल्याचा गंभीर आरोप केला होता. याप्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश हायकोर्टाने दिले होते. याप्रकरणाच्या चौकशीची सुरुवात सीबीआयने याचिकाकर्त्या जयश्री पाटील यांच्या जबाबानं केली. त्यानंतर परमबीर सिंह यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात उल्लेख असलेल्या गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त डॉ. राजू भुजबळ आणि सहाय्यक पोलीस आयुक्त संजय पाटील यांचीही चौकशी करण्यात आली होती.

Exit mobile version