सीबीआयने केला अनिल देशमुखांवर गुन्हा दाखल

सीबीआयने केला अनिल देशमुखांवर गुन्हा दाखल

अँटिलिया समोरील स्फोटके आणि मुंबईतून करण्यात येणाऱ्या १०० कोटींच्या कथित वसूली प्रकरणी सीबीआयने माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांची चौकशी केली होती. आज या प्रकरणी सीबीआयने गुन्हा दाखल केला. अनिल देशमुख यांच्या घरावर आज सीबीआयने छापे मारले आहेत.

सीबीआयने आज सकाळीच अनिल देशमुख यांच्यावर भ्रष्टाचाराचा गुन्हा दाखल करून त्यानुसार कारवाईला सुरूवात केली आहे. अनिल देशमुख यांच्या सोबतच त्यांच्या पीएंच्या घरावर देखील छापे मारले जाणार आहेत. परमबीर सिंह यांनी शंभर कोटींच्या वसुलीचे आरोप त्यांच्यावर केले होते. त्या प्रकरणातील तपासाला सुरूवात झाली आहे.

हे ही वाचा:

देशातील ऑक्सिजन उत्पादकांशी मोदींचा संवाद

…आणि पहिली ऑक्सिजन एक्सप्रेस महाराष्ट्रात दाखल

विरार दुर्घटनेतील मृत व्यक्तीच्या पत्नीचाही अंत

देशात लवकरच तयार होणार दिवसाला ३ लाख रेमडेसिवीर

मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबील सिंह यांनी गृहमंत्र्यांवर शंभर कोटींच्या वसुलीचे गंभीर आरोप केले होते. त्यानुसार सिंह यांनी न्यायालयात याचिका देखील दाखल केली होती. या प्रकरणात न्यायालयाने सीबीआय चौकशीचे आदेश दिले होते. त्यावेळी पदावर असताना निष्पक्ष चौकशी होऊ शकत नाही असे निरीक्षण नोंदवल्यानंतर, अनिल देशमुख यांना गृहमंत्री पदाचा राजिनामा द्यावा लागला होता.

प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घरासमोर सापडलेल्या स्फोटकांच्या प्रकरणात अनेक पोलिस अधिकाऱ्यांची नावे समोर आली होती. त्याबरोबरच हे प्रकरण थेट गृहमंत्र्यांशी सुद्धा जोडले गेले आहे. सचिन वाझे सह त्याचे काही साथीदार, त्याशिवाय पोलिस दलातील इतर काही अधिकारी देखील या प्रकरणात अटकेत गेले आहेत. त्यामुळे एकंदरीतच मोठ्या प्रमाणातील भ्रष्टाचार समोर येण्याची शक्यता नाकारता येत नाही.

Exit mobile version