‘१९९३ मुंबई बॉम्बस्फोटाची पुन्हा CBI चौकशी करा’

‘१९९३ मुंबई बॉम्बस्फोटाची पुन्हा CBI चौकशी करा’

महाविकास आघाडीचे नेते नवाब मलिक मनी लौंड्रिंग प्रकरणी तुरुंगात असल्यामुळे १९९३ चे बॉम्बस्फोट प्रकरण पुन्हा चर्चेत आले आहे. दहशतवादी दाऊद इब्राहिमच्या मदतीने जमीन व्यवहार केल्याचा मलिकांवर आरोप आहे. यामुळे भारतीय जनता पार्टीने त्यांच्या राजीनाम्याची मागणी सातत्याने लावून धरली आहे. त्यात आता भाजपा नेते मोहित कंबोज यांनी केलेल्या एका मागणीवरून राजकारणात खळबळ उडण्याची शक्यता आहे.

मोहित कंबोज यांनी त्यांच्या ट्विटवरून १९९३ साली मुंबईमध्ये झालेल्या बॉम्बस्फोटाची चौकशी करण्याची मागणी केली आहे. तसेच ज्यांचा टेरर फंडिंगमध्ये समावेश आहे त्याचाही पर्दाफाश करण्यात यावा. टेरर फंडिंगमधील अनेकांवर आरोप लावून क्लीन चीट मिळाली आहे. आणि ज्यांना ज्यांना क्लीन चीट मिळाली आहे ते आता चांगल्या पदावर आहेत. त्यामुळे १९९३ बॉम्बस्फोटांची पुन्हा सीबीआय चौकशी करून त्यांचा पर्दाफाश करण्यात यावा, अशीही मागणी केली आहे.

एवढेच नाही तर यातील अनेक लोक यातील टायगर मेमनसाठी पैसे फिरवत होते. त्यांनाही समोर आणले पाहिजे, असेही ट्विटरवर कंबोज म्हणाले आहेत. आणि हे ट्विट कंबोज यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना टॅग करून सीबीआयच्या चौकशीची मागणी केली.

हे ही वाचा:

मिलिंद नार्वेकरचा बंगला तुटला, आता अनिल परबचे रिसॉर्ट तुटणार

… म्हणून येणार इस्रायलचे पंतप्रधान भारत दौऱ्यावर!

कलम ३७० पुन्हा लागू करा…शिवसेनेची मागणी

हिजाब वादावर निकाल देणाऱ्या न्यायाधीशांना धमकी,दोघांना अटक

नवाब मलिकांनी मुंबई उच्च न्यायालयात ईडीच्या कारवाईविरुद्ध याचिका दाखल केली होती. मात्र मुंबई उच्च न्यायालयानेही मलिकांची याचीका फेटाळून लावली आहे. दरम्यान, विधानसभेत भाजपाचे नेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारवर दाऊदचा दबाव आहे का अशी विचारणाही केली होती.

Exit mobile version