काँग्रेसचे सरचिटणीस आणि छत्तीसगडचे माजी मुख्यमंत्री भूपेश बघेल यांच्या अडचणींमध्ये वाढ झाली आहे. महादेव बेटिंग ऍप प्रकरणात ईडीनंतर आता केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) भूपेश बघेल यांच्या निवासस्थानी छापा टाकला आहे. त्यांच्या संबंधित इतर ठिकाणीही छापेमारीही करण्यात येत आहे.
सीबीआयकडून महादेव बेटिंग ऍप प्रकरणाचा तपास सुरू करण्यात आला आहे. या प्रकरणात हजारो कोटी रुपयांची फसवणूक झाल्याचा आरोप आहे. सीबीआयचे अधिकारी बुधवारी सकाळीच लवकर भिलाई आणि रायपूर येथील निवासस्थानी पोहोचले आहेत. माहितीनुसार, महादेव बेटिंग ऍप प्रकरणात छापा टाकण्यासाठी सीबीआयचे पथक दाखल झाले आहे. यापूर्वी ईडीच्या पथकानेही छापे टाकले होते.
भूपेश बघेल हे दिल्लीतील काँग्रेस मुख्यालयात होणाऱ्या बैठकीला उपस्थित राहण्याच्या नियोजित वेळेपूर्वीच केंद्रीय तपास पथकाचे अधिकारी रायपूर आणि भिलाई येथे पोहोचले, असे त्यांच्या कार्यालयाने ट्विटमध्ये म्हटले आहे. “आता सीबीआय आली आहे. माजी मुख्यमंत्री भूपेश बघेल हे ८ आणि ९ एप्रिल रोजी अहमदाबाद (गुजरात) येथे होणाऱ्या एआयसीसी बैठकीसाठी स्थापन केलेल्या ‘मसुदा समिती’च्या बैठकीसाठी आज दिल्लीला जाणार आहेत. त्यापूर्वीच, सीबीआय रायपूर आणि भिलाई येथील निवासस्थानी पोहोचली आहे,” असे कार्यालयाने म्हटले आहे.
हे ही वाचा :
जैसलमेरमधून संशयित पाकिस्तानी हेराला अटक!
अवैध मदरसांवर सरकारच्या कारवाईला बोर्डचा पाठिंबा
काँग्रेसने आपला अजेंडा आणि झेंडा मुस्लिम लीगच्या कार्यालयात सरेंडर केला
कुणाल कामराला पुन्हा खुमखुमी, नवे गाणे केले पोस्ट
ईडीने यापूर्वी छत्तीसगडच्या भिलाई येथील पदुमनगर भागात भूपेश बघेल यांचे चिरंजीव चैतन्य बघेल यांच्या निवासस्थानी छापा टाकला होता. यात केंद्रीय तपास यंत्रणेने राज्यभरात सुमारे १४ ठिकाणी छापे टाकले होते त्यापैकी काही ठिकाणे चैतन्य बघेल यांच्याशी संबंधित आहेत. दस्तऐवजांची तपासणी केली होती. ईडीने आरोप केला आहे की, सरकारी अधिकारी, राजकारणी आणि दारू व्यावसायिकांच्या एका गटाने २०१९ ते २०२२ दरम्यान राज्यात दारू विक्रीतून सुमारे २,१६१ कोटी रुपये बेकायदेशीरपणे गोळा केले आहेत. कथित घोटाळ्यात दारू पुरवठा साखळीत फेरफार करण्यात आला होता, जिथे एका गटाने सरकारी दुकानांद्वारे दारूची विक्री आणि वितरण नियंत्रित केले. छत्तीसगडमधील काँग्रेसच्या नेतृत्वाखालील मागील सरकारशी संबंधित राजकारणी आणि अधिकाऱ्यांच्या घरावर या एजन्सीने यापूर्वी अनेक छापे टाकले आहेत.