24 C
Mumbai
Tuesday, December 24, 2024
घरक्राईमनामाचिदंबरम यांच्या घरात पोहोचली सीबीआय

चिदंबरम यांच्या घरात पोहोचली सीबीआय

Google News Follow

Related

ज्येष्ठ काँग्रेस नेते पी. चिदंबरम आणि त्यांचा मुलगा कार्ती चिदंबरम यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) पी. चिदंबरम आणि त्यांचा मुलगा कार्ती चिदंबरम यांच्या घरावर छापा टाकला आहे. पी. चिदंबरम यांच्या सात ठिकाणांवर सीबीआयने छापे टाकले आहेत. चिदंबरम यांच्या दिल्ली, मुंबई, चेन्नई आणि तामिळनाडू येथील कार्यालयांवर आणि घरांवर कारवाई सुरू आहे.

सीबीआयने चिदंबरम यांचा मुलगा कार्ती चिदंबरम यांच्यावर कथित विदेशी गुंतवणुकीप्रकरणी ही कारवाई केल्याचे वृत्त आहे. २०१०- २०१४ दरम्यान सीबीआयने या प्रकरणी नवीन गुन्हा दाखल केला आहे. त्याच प्रकरणी ही कारवाई करण्यात येत आहे. २०१०- २०१४ दरम्यान विदेशात पैसे पाठवण्याप्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हे ही वाचा:

वुमन्स टी-२० चॅलेंजसाठी तीन संघ या दिवसापासून मैदानात उतरणार

कराची स्फोटाने पुन्हा हादरले; एका महिलेचा मृत्यू

आसाममध्ये पावसाचा हाहाकार; २ लाख लोकांना पुराचा फटका

दहशतवादी संघटनेकडून काश्मिरी पंडितांना धमकीचे पत्र

दरम्यान, सीबीआयच्या छापेमारीनंतर कार्ती चिदंबरम यांनी ट्विट करून म्हटले की, “मी मोजणी विसरलो, असे किती वेळा झाले? रेकॉर्ड असेल.” पी चिदंबरम हे काँग्रेस सरकारमध्ये अर्थमंत्री आणि गृहमंत्री राहिले आहेत.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
216,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा