राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आणि महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या अडचणी कमी होण्याचे सोडून दिवसेंदिवस वाढताना दिसत आहेत. अनिल देशमुख हे सक्तवसुली संचालनालय आणि राष्ट्रीय तपास यंत्रणा अशा दोन केंद्रीय यंत्रणांच्या रडारवर आहेत. सोमवार, ११ ऑक्टोबर रोजी अनिल देशमुख यांच्या घरावर सीबीआय पथकाने छापेमारी केली आहे. तर देशमुख यांच्या मुलाच्या विरोधात सीबीआयने अटक वॉरंट काढले असल्याचीही माहिती मिळत आहे.
सोमवारी सकाळी देशमुख यांच्या नागपुर मधील निवास स्थानी सीबीआयची धाड पडली आहे. सकाळी सकाळी सीबीआयचे पथक देशमुख यांच्या निवासस्थानी धडकले. शंभर कोटी वसुली प्रकरणाशी संबंधित ही धाड असल्याचे समजते. तर अनिल देशमुख यांचे चिरंजीव सलील देशमुख यांच्या नावे सीबीआयने अटक वॉरंट जारी केल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. त्यामुळे सलील देशमुख यांना अटक होणार का? असा सवाल उपस्थित होत आहे. तर आता तरी अनिल देशमुख आता तरी अज्ञातवासातून बाहेर येणार का? हे बघणे महत्वाचे असणार आहे.
हे ही वाचा:
‘बंद आणि विरोध यांचा “धंदा”, गोळा होतो त्यावरच “चंदा”!’
बंद यशस्वी करण्यासाठी मविआची जोर जबरदस्ती
चेन्नई सुपर किंग्स पुन्हा एकदा अंतिम फेरीत
आरीफ मोहम्मद खान म्हणतात, अल्पसंख्य ही संकल्पनाच मान्य नाही, मी भारतीय आहे
मध्यंतरी अनिल देशमुख यांना सीबीआयने क्लीन चिट दिल्याचा एक खोटा रिपोर्ट माध्यमांमध्ये पसरवण्यात आला होता. तेव्हा देशमुख यांच्या जावयाला चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले होते. तर देशमुख यांच्या वकील आनंद गाडा यांच्यामार्फत सीबीआय अधिकारी अभिषेक तिवारी यांना लाच देऊन केस संदर्भातील गोपनीय माहिती मिळाल्याचेही पुढे आले होते. तिवारी यांना अनिल देशमुख यांच्या वकिलाने आयफोन १२ प्रो हा मोबाईल आणि एक लाख रुपये रोख अशा स्वरूपात लाच दिली होती.