सिसोदियांच्या घरी सीबीआय

मनिष सिसोदिया यांच्या निवास्थानी आज सकाळी सीबीआयचे पथक पोहचले असून त्यांच्या घरासह २१ ठिकाणी सीबीआयकडून छापेमारी सुरू आहे.

सिसोदियांच्या घरी सीबीआय

दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनिष सिसोदिया यांच्या अडचणीत वाढ झाली असून त्यांच्या घरी सीबीआयचे अधिकारी पोहचले आहे. मनिष सिसोदिया यांनी ट्विटकरत यासंबंधीची माहिती दिली आहे. आज १९ ऑगस्ट रोजी सीबीआयने सकाळी ही कारवाई केली आहे. दरम्यान, सिसोदिया यांच्या निवासस्थानाजवळ मोठा पोलीस बंदोबस्त करण्यात आला आहे.

मनिष सिसोदिया यांच्या निवास्थानी आज सकाळी सीबीआयचे पथक पोहचले असून त्यांच्या घरासह २१ ठिकाणी सीबीआयकडून छापेमारी सुरू आहे. दिल्लीमधील उत्पादन शुल्क धोरणातील कथित अनियमिततेच्या संदर्भात ही छापेमारी करण्यात येतं असल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान, मनिष सिसोदिया आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी ट्वीट करत सीबीआयच्या कारवाईचा निषेध केला आहे.

“सीबीआय आली आहे आणि त्यांचे स्वागत आहे. आम्ही प्रामाणिक आहोत. लाखो मुलांचं भविष्य घडवत आहोत. मात्र, दुर्दैव आहे की आपल्या देशात चांगले काम करणाऱ्यांना अशा प्रकारे त्रास दिला जातो. त्यामुळेच आपला देश अजून क्रमांक १ वर पोहचलेला नाही,” असे ट्विट सिसोदिया यांनी केले आहे. तर सीबीआयला संपूर्ण सहयोग करणार असून सत्य लवकरच समोर येईल. दिल्लीतील आरोग्य आणि शिक्षण विभागात जे उत्तम जाम होत आहे त्यावर ते नाराज आहेत, असेही ते म्हणाले आहेत.

हे ही वाचा:

कंबोज यांच्यानंतर आता निंबाळकरांचा ईडीस्फोट

दहीहंडी, गणेशोत्सवादरम्यान दाखल झालेले गुन्हे घेणार मागे

ती बोट इंजिन बंद पडल्याने भरकटली आणि हरिहरेश्वरला आली

भरपावसाळ्यात गटारावरील झाकणे चोरणाऱ्याला अटक

मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनीदेखील ट्विट करत सीबीआयच्या कारवाईचा निषेध केला आहे. तसेच तपासात सहकार्य करणार असल्याचंही ते म्हणाले आहेत.

Exit mobile version