सिसोदियांसह १३ जणांविरुद्ध लुकआऊट नोटीस जारी

दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांच्या अडचणीत वाढ झाली आहे.

सिसोदियांसह १३ जणांविरुद्ध लुकआऊट नोटीस जारी

दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. सीबीआयने केलेल्या छापेमारीनंतर दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांच्याविरोधात आता लुकआउट नोटीस जारी करण्यात आली आहे. तसेच त्यांच्या देशाबाहेर जाण्यावर बंदी घालण्यात आली आहे. सिसोदिया यांच्यासह एकूण १३ जणांविरुद्ध लुकआऊट नोटीस जारी करण्यात आले आहे.

दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांच्या निवासस्थानासह आणखी २० ठिकाणी सीबीआयने शुक्रवार, १९ ऑगस्ट रोजी छापेमारी केली होती. साधारण १४ तास हा तपास सुरू होता. यानंतर सीबीआयने मनीष सिसोदिया यांच्यासह १५ जणांविरोधात एफआयआर दाखल केला. दिल्लीमधील उत्पादन शुल्क धोरणातील कथित अनियमिततेच्या संदर्भात सीबीआयने ही छापेमारी करण्यात आली.

त्यानंतर आता सीबीआयने लुकआउट नोटीस जारी केली आहे. तसेच सिसोदिया यांच्यासह एकूण १३ जणांविरुद्ध लुकआउट नोटीस जारी करण्यात आली असून त्यांना देश सोडून जाण्याची परवानगी देण्यात आलेली नाही.

हे ही वाचा:

१४ तास तपास; सिसोदियांना अटक होणार?

मुंबई पोलिस ट्रॅफिक कंट्रोल रूमला ‘हा’ धमकीचा मेसेज, यंत्रणा अलर्टवर

१४ तास तपास; सिसोदियांना अटक होणार?

कंबोज यांच्यानंतर आता निंबाळकरांचा ईडीस्फोट

त्यानंतर सिसोदिया यांनी एक ट्विट केलं असून “सीबीआयच्या कारवाईनंतर हातीच काही आलं नाही आता लुकआउट नोटीस जारी केलं आहे पण मी तर दिल्लीत रस्त्यांवर फिरत आहे. कुठे यायचं ते सांगा,” असे ट्विट सिसोदिया यांनी ट्विट केले आहे.

Exit mobile version